शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : सायंकाळी ३५ अहवाल निगेटिव्ह; नऊ जणांना ‘डिस्चार्ज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 18:33 IST

सायंकाळी प्राप्त झालेले ३५ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले.

ठळक मुद्दे दुपारी आणखी नऊ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.आता ११७ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

अकोला : दररोज झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने चिंताग्रस्त झालेल्या अकोलेकरांसाठी रविवारची सायंकाळ किंचित दिलासा देणारी ठरली. सायंकाळी प्राप्त झालेले ३५ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. सकाळी सात अहवाल निगेटिव्ह आले होते. अशाप्रकारे दिवससभरात ४२ अहवाल निगेटिव्ह आले. तर दुपारी आणखी नऊ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता ११७ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल लॅब’कडून रविवारी सकाळी १८  अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी •सात जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण हरिहरपेठ येथील दोन, खदान, जी. वी. खदान, गायत्री नगर कौलखेड रोड, गोडबोले प्लॉट,  फिरदोस कॉलनी, जुने शहर,  तारफैल, जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत. सायंकाळी प्राप्त सर्व ३५ अहवाल निगेटिव्ह  आल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला.   

शनिवारी रात्री दोघांचा मृत्यू शनिवार रात्री दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये एक व्यक्ती सुधीर कॉलनी सिव्हिल लाइन येथील रहिवासी आहेत. या ३८ वर्षीय व्यक्तीला २७ मे रोजी दाखल करण्यात आले होते. मृत्यू झालेली दुसरी व्यक्ती बाळापूर येथील  असून, ५४ वर्षीय या व्यक्तीला २६ मे रोजी दाखल करण्यात आले होते. या दोघांचा काल रात्री मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने रविवारी जाहीर केले. 

 आणखी नऊ जणांना ‘डिस्चार्ज’रविवारी दुपारी आणखी नऊ जणांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. त्यातील सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले, तर अन्य दोघांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ४३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण ३२ जणांचा मृत्यू (एक कोरोनाबाधिताची आत्महत्या) झाला आहे. त्यामुळे आता शासकीय रुग्णालयात ११७ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला