अकोला : अकोल्यात हातपाय पसरत असलेल्या कोरोनाची गती आता चांगलीच वाढली असून, शुक्रवार, ८ मे रोजी दिवसभरात शहराच्या विविध भागातील ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, एका मृत्यूची नोंद झाली आहे. १ मे रोजी दाखल झालेली महिला शुक्रवारी उपचारादरम्यान दगावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून सायंकाळी देण्यात आली. सात एप्रिल रोजी कोविड-१९ चा पहिला रुग्ण आढळलेल्या अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १२९ वर पोहचली असून, सद्यस्थितीत १०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान,कोरोनाच्या बळींचा आकडा एकने वाढून तो १२ झाला आहे.रेड झोनमध्ये असलेल्या अकोला शहरात गत आठवडाभरापासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, शुक्रवारी सकाळी कोरोनाबाधीतांची एकूण संख्या शंभरी पार होऊन १०५ झाली होती. सायंकाळी यामध्ये आणखी २४ नव्या रुग्णांची भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२९ झाली असून, १०३ पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून शुक्रवारी दिवसभरात १८२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी सकाळी १०, तर सायंकाळी २४ असे एकून ३४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १४८ अहवाल निगटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये १२ वर्षाच्या मुलीसह १८ महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. शुक्रवारी दिवभरात बैदपूरा भागातील १८, राधाकिसन प्लॉट-२, मोह. अलीा रोड-३, खैर मोहम्मद प्लॉट-२, सराफा बाजार-२, जुना तारफैल-१, गुलजार पुरा-१, आळशी प्लॉट-१, मोमिन पुरा-१, भगतसिंग चौक माळीपुरा-१, जुने शहर अकोला-१, राठी मार्केट-१ असे एकून ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता एकून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२९ झाली आहे. यापैकी १४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ११ जणांचा मृत्यू कोेविड-१९ आजाराने झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे.
CoronaVirus in Akola : दिवसभरात ३४ पॉझिटिव्ह; एक मृत्यू ; एकूण रुग्णसंख्या १२९ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 18:20 IST
३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, एका मृत्यूची नोंद झाली आहे.
CoronaVirus in Akola : दिवसभरात ३४ पॉझिटिव्ह; एक मृत्यू ; एकूण रुग्णसंख्या १२९ वर
ठळक मुद्दे१ मे रोजी दाखल झालेली महिला शुक्रवारी उपचारादरम्यान दगावली.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये १२ वर्षाच्या मुलीसह १८ महिला व १६ पुरुषांचा समावेश.जिल्ह्यात आता एकून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२९ झाली आहे.