शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी ३२ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू, एकूण रुग्णसंंख्या २५२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:42 IST

१६९ संदिग्ध रुग्णांच्या अहवालापैकी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, अन्य १३७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्दे एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील मृतकांचा आकडाही १७ वर गेला आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये १० महिला व २२ पुरुषांचा समावेश आहे. सद्यस्थितीत ११७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

अकोला : अकोलेकरांसाठी शनिवारचा दिवस दिलासादायक ठरल्यानंतर रविवार, १७ मे रोजी तब्बल ३२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कालचा दिलास औटघटकेचा ठरला. रविवारी प्राप्त झालेल्या १६९ संदिग्ध रुग्णांच्या अहवालापैकी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, अन्य १३७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, बुधवार, १३ मे रोजी मयत झालेल्या मुर्तीजापूर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील मृतकांचा आकडाही १७ वर गेला आहे. एकूण रुग्णांची संख्या २५२ झाली असून, रविवारी १७ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ११७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. शनिवारी केवळ दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोलेकरांना किंचित दिलासा मिळाला होता. रविवारी तब्बल ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये १० महिला व २२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये तारफैल भागातील ४, माळीपूरा- ४, खैर मोहम्मद प्लॉट- ४ आंबेडकर नगर- ३, ताजनापेठ- ३,अकोट फैल-३, तर मुर्तिजापूर,अगरवेस,बिर्ला गेट, जठारपेठ, खरप, काळा मारोती, जुना आळशी प्लॉट, वर्धमान डुप्लेक्स राजपुतपुरा,रामदासपेठ पोलीस क्वाँर्टर, नायगाव,खोलेश्वर, शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यामधील एक महिला जिल्हा स्त्री रुग्णालातून संदर्भित झालेली आहे. मुर्तीजापूर येथील ४८ वर्षीय व्यक्तीला बुधवार, १३ मे रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या व्यक्तीचा त्याच दिवशी मृत्यू झाला. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित मृतकांची संख्याही १७ झाली आहे. एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली असून, एकूण १८ मृत्यूची नोंद आहे.आज प्राप्त अहवाल-१६९पॉझिटीव्ह-३२निगेटीव्ह-१३७आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-२५२मयत-१८(१७+१),डिस्चार्ज-११७दाखल रुग्ण(अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११७

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याMurtijapurमुर्तिजापूर