शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात ३० पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू; ३४ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:46 IST

दिवसभरात ३० नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३३८८ वर गेली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शुक्रवार, २१ आॅगस्ट रोजी अकोला शहर व म्हैसपूर या गावातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४३ वर पोहचला आहे. दिवसभरात ३० नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३३८८ वर गेली आहे. दरम्यान, ३४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे २६७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३० जण पॉझिटिव्ह असून, तब्बल २३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ३० जणांमध्ये १३ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये वाडेगाव येथील १० जणांसह आपातापा व जूने शहर येथील प्रत्येकी तीन जण, व्याळा, मुर्तिजापूर, खदान येथील प्रत्येकी दोन जण, नेहरु पार्क, लक्ष्मी नगर, कापशी,लोहारा, नकाशी, जीएमसी, डाबकी रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.दोघांचा मृत्यूकोरोनाने शुक्रवारी आणखी दोघांचा बळी घेतला. यापैकी एक रुग्ण हा अकोला शहरातील बाळापूर नाका परिसरातील ७४ वर्षीय पुरुष असून, त्यांना १९ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. बार्शीटाकळी तालुक्यातील म्हैसपूर येथील ४२ वर्षीय महिलेचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेस १७ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.३४ जणांना डिस्चार्जशुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, कोविड केअर सेंटर येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून ११, हॉटेल रिजेन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून एक, कोविड केअर सेंटर, बाळापूर येथून एक, तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून एक अशा एकूण ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३३१ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३८८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २९१४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३३१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला