शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

CoronaVirus in Akola : दिवसभरात २१ रुग्ण वाढले; ८१ जण बरे झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:25 IST

कारागृहातील ६९ कैद्यांसह तब्बल ८१ जणांनी कोरोनावर मात केली.

ठळक मुद्दे२१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.एकूण संख्या १८४९ वर गेली.सद्यस्थितीत ३०८ जणांवर उपचार सुरु.

अकोला : कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतानाच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. शुक्रवार, १० जुलै रोजी जिल्हाभरात आणखी २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर दुसरीकडे कारागृहातील ६९ कैद्यांसह तब्बल ८१ जणांनी कोरोनावर मात केली. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८४९ वर गेली असून, सद्यस्थितीत ३०८ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात २३० जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सात महिला व १४ पुरुष आहेत. त्यातील चार जण कंवरनगर येथील, तिघे अकोट, तिघे बाळापूर, दोन बार्शीटाकळी, दोन कृषिनगर-अकोला, तर उर्वरीत तारफैल, कावसा ता. अकोट,पातूर, बाळापूर, बोरगाव, सिंधी कॅम्प व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्हा कारागृहातील ६९ जणांसह ८१ जणांना डिस्चार्जशुक्रवारी दिवसभरात ८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दुपारनंतर कोविड केअर सेंटर मधून पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात तिघे बाळापूरचे तर दोघे हरिहर पेठ येथील रहिवासी आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोन जण डाबकी रोड येथील रहिवासी असून उर्वरित वाशीम बायपास, हरिहर पेठ, सिव्हिल लाईन, पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच जिल्हा कारागृहातील कोविड केअर सेंटर मधील ६९ जण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. तथापि, कोरोनातून बरे झालेले कैदी केवळ कारागृहात स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज झाले आहेत. त्यांची कारागृहातच स्वतंत्र व्यवस्था व देखभाल केली जात आहे, असे जिल्हा कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे.३०८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १८४९ (१८२८+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९१ जण (एक आत्महत्या व ९० कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १४५० आहे. तर सद्यस्थितीत ३०८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला