शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात २० कोरोनामुक्त झाले; २२ रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:35 IST

मंगळवार, २ जून रोजी आणखी २० जणांना रुग्णालायातून सुटी देण्यात आली.

ठळक मुद्दे आणखी २२ रुग्णांची भर पडत एकूण बाधित रुग्णांची संख्या ६२७ झाली आहे. आज दुपारी २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.त्यात सात महिला व १३ पुरुष आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असतानाच, मंगळवार, २ जून रोजी आणखी २० जणांना रुग्णालायातून सुटी देण्यात आली. दरम्यान, दिवसभरात आणखी २२ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६२७ झाली आहे. तथापी, यापैकी ४६२ रुग्ण बरे झाल्याने आता फक्त १३१ रुग्ण उपचारार्थ दाखल असल्याचे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले.सोमवारी सकाळी प्राप्त ४८ पैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर उर्वरित २७ अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात १२ महिला व १० पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. दोन महिला रुग्ण ह्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहेत. हे रुग्ण रजपुतपुरा येथील तीन, सिंधी कॅम्प येथिल दोन, माळीपुरा येथील दोन, अशोकनगर अकोट फैल येथील दोन तर उर्वरीत तारफैल, सिटी कोतवाली, जठारपेठ, आंबेडकरनगर, शिवसेना वसाहत, जुने तारफैल, आदर्श कॉलनी, गुलशन कॉलनी, रुद्रनगर, जुनी उमरी नाका, खदान, पुरानी मशिद आणि अलिम चौक खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सायंकाळी केवळ एकच निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला. आतापर्यंत ४६२ रुग्ण बरे झाल्याने सद्यस्थितीत १३१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी दिली.

सोमवारी २० जणांना डिस्चार्जआज दुपारी २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सात महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील १३ जणांना घरी सोडण्यात आले. तर उर्वरित सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यातील तिन जण रामदास पेठ येथिल, तीन जण अकोट फैल येथील, दोन जण पातूर येथिल, दोन जण सिटी कोतवाली येथील, तर अन्य गोरक्षण रोड, मलकापूर, मोहता मिल, गुलजार पुरा, आगरवेस, फिरदौस कॉलनी, शिवर, रजपुतपुरा, तारफैल, कमलानगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-६२७मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४६२दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३१ 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या