शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola :  आणखी १९ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३१९५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:12 IST

शुक्रवार, १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आणखी १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१९५ वर गेली आहे.

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या, तरी या संसर्गजन्य आजाराचा प्रादूर्भाव थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे सत्र सुरुच असून, शुक्रवार, १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आणखी १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१९५ वर गेली आहे.नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदरही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १६९ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १९ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५० जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालेल्या १९ जणांमध्ये पाच महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील पाच जणांसह, अकोल्यातील केळकर रुग्णालय व बार्शीटाकळी शहरातील प्रत्येकी तीन जण, अकोट येथील दोन जण, अकोट तालुक्यातील चंडिकापूर, अकोला तालुक्यातील पाळोदी, मुर्तीजापूर, अकोला शहरातील शिवसेना वसाहत, खदान व कौलखेड भागातील प्रत्येकी अशा एकूण १९ रुग्णांचा समावेश आहे.५४६ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१९५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २५१८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५४६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या