शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; ३३ रुग्ण वाढले; ४१ जण बरे झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 19:58 IST

शुक्रवारी ४१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला : कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवार, ७ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १८ तर रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्यांमध्ये १५ असे एकूण ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या बळींचा आकडा ११४ वर गेला असून, एकूण रुग्णसंख्या २,९२३ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी ४१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी दिवसभरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे १५३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३५ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पाच महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये चार जण बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथील असून, दोन जण बार्शीटाकळी, दोन जण अकोट, दोन जण तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील आहेत. याशिवाय सिव्हिल लाइन, जठारपेठ, जीएमसी वसतिगृह, रामनगर, माधव नगर, दत्त नगर, कैलास टेकडी अकोला आणि मूर्तिजापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यूकोरोनामुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या वाढतच असून, गुरुवारी रात्री ६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ येथील रहिवासी असून, त्यांना २८ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. 

४१ जणांना डिस्चार्जदरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १०, कोविड केअर सेंटर येथून १२, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून आठ, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून चार, हॉटेल रणजित येथून तीन असे एकूण ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४६४ जणांवर उपचार सुरूजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २,९२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २,३४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४६४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या