शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

CoronaVirus in Akola : पाच दिवसांत १३ जणांचा मृत्यू; ४७८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 23:15 IST

कोरोनाबळींचा आकडा १६५ वर गेला असून, एकूण रुग्णसंख्या ४५३१ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, १ ते ५ सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तर तब्बल ४७८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबळींचा आकडा १६५ वर गेला असून, एकूण रुग्णसंख्या ४५३१ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ४१८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२७ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामध्ये पातूर तालुक्यातील तांदळी येथील ३८ जणांसह, पिंजर येथील १२ जण, बटवाडी बु. येथील पाच जण, कौलखेड येथील चार जण, केशव नगर येथील तीन जण, हातरुण व सेंट्रल जेल येथील प्रत्येकी आठ जण, जीएमसी, न्यु राधाकीसन प्लॉट, जूने शहर येथील प्रत्येकी तीन जण, कौलखेड, सस्ती, पातूर, गोरेगाव खु. येथील प्रत्येकी दोन जण, गोरक्षण रोड, लहान उमरी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर मंगरुळ, बाळापूर, मालेगाव बाजार, रेणूका नगर, जूने खेतान, राजपूतपुरा, टिळक वाडी, पंचगव्हाण, अमानखॉ प्लॉट, रवि नगर, भारती प्लॉट, रामनगर व बेलूरा ता. पातूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.कापशी, मुर्तीजापूरातील रुग्णांचा मृत्यूशनिवारी आणखी दोन कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये पातूर तालुक्यातील कापसी तलाव येथील ७३ वर्षीय महिला व मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या दोघांनाही २ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.शनिवारी १४७ रुग्णांची भरशनिवारी दिवसभरात १४७ रुग्ण आढळून आले. व्हीआरडीएल प्रयोगशाळेच्या आरटीपीसीआर चाचण्यांचे १२७, नागपूर येथील खाजगी प्रयोगशाळेकडून प्राप्त १६ अहवाल व रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांच्या चार अहवालांचा समावेश आहे.४६ जण कोरोनामुक्तशनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २०, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १३, मुर्तिजापूर उप जिल्हा रुग्णालयातून सात, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, हॉटेल रणजित येथून एकअशा एकूण ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.९३० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,४२० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९३० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या