शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी ११ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १९७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:38 IST

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर म्हणजेच १९७ वर पोहली आहे.

ठळक मुद्दे१४ मे रोजी यामध्ये आणखी ११ नव्या रुग्णांची भर पडली.कोरोनाबाधितांची संख्या १९७ वर पोहली आहे.सद्यस्थितीत १२२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु.

अकोला : अकोल्यात हातपाय पसरलेल्या कोरोना विषाणूने आता चांगलाच वेग घेतला असून, कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणीक झपाट्याने वाढत आहे. गुरुवार, १४ मे रोजी यामध्ये आणखी ११ नव्या रुग्णांची भर पडली असून, या अकरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर म्हणजेच १९७ वर पोहली आहे. सद्यस्थितीत १२२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी सकाळी सांगण्यात आले.विदर्भात नागपूरनंतर अकोला शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. सुरुवातीला केवळ बैदपूरा भागापर्यंत मर्यादित असलेल्या कोरोना विषाणूने अल्पावधित संपूर्ण शहरच कवेत घेतले असून, विविध भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवार, १४ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून एकूण ७४ जणांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये नऊ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. यामध्ये दोन रुग्ण हे खैर मोहम्मद प्लॉट, दोन माळीपूरा, तसेच फिरदोस कॉलनी,आंबेडकर नगर, शासकीय गोदाम खदान, गोकुळ कॉलनी, तारफैल, खडकी, पोलीस क्वार्टर येथील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आज ११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९७ झाली आहे. यामधून आतापर्यंत ६० जणांनी कोरोनावर मात केली असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. कोवीड-१९ आजाराने १४ जणांचा मृत्यू, तर एका रुग्णाची आत्महत्या, अशा एकूण १५ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.आज प्राप्त अहवाल-७४पॉझिटीव्ह-११निगेटीव्ह-६३आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- १९७मयत-१५(१४+१),डिस्चार्ज- ६०दाखल रुग्ण( पॉझिटिव्ह)- १२२

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या