शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात १०६ नवे पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू, ३१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 19:02 IST

दिवसभरात १०६ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४३५६ वर गेली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील मलकापूूर, तेल्हारा तालुक्यातील सिरसोली व मुर्तीजापूर येथील प्रत्येकी एक अशा तिघांचा मृत्यू झाला. यामुळे मृतकांची एकूण संख्या १६३ झाली आहे. दिवसभरात १०६ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४३५६ वर गेली आहे. दरम्यान, ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी ५२७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरीत ४२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एकट्या मुर्तिजापूर येथील २४ जणांसह, निंबा ता. मुर्तिजापूर येथील ११ जण, वाडेगाव येथील १४ जण,मोरवा ता. बाळापूर येथील सात जण, जीएमसी येथील सहा जण, बाळापूर येथील चार जण, कौलखेड, विद्यानगर गौरक्षणरोड, येथील प्रत्येकी तीन जण, खडकी, गीता नगर, जठारपेठ, डाबकी रोड, दहिगाव गावंडे येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित लहान उमरी, लोणी, चोहट्टा बाजार, तुकाराम चौक, गायत्री नगर, गंगा नगर, गंगाधर प्लॉट, रणपिसे नगर, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, मलकापूर, मराठा नगर, कापसी, तापडीया नगर, निंबवाडी, सकनी महान, पातूर नंदापूर, प्रोफेसर कॉलनी, शिवसेना वसाहत, बळवंत कॉलनी, रवि नगर, नांदुरा ता. तेल्हारा, बटवाडी ता. बाळापूर, कासारखेड ता. बाळापूर व खेडगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.दोन महिला, एक पुरुषाचा मृत्यूशुक्रवारी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये मलकापूर येथील ५५ वर्षीय महिला, सिरसोली ता. तेल्हारा येथील ६५ वर्षीय महिला व मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या तिघांनाही अनुक्रमे २ सप्टेंबर, १९ आॅगस्ट व २९ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.३१ जणांना डिस्चार्जशुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २९ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून दोन जणांना अशा एकूण ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

८१९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४,३५६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,३७४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८१९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला