शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कृ षी विद्यापीठात ७८ संदिग्ध रुग्ण देखरेखीखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:14 IST

ज्या रूग्णांचे नमुने दुसऱ्यांदा ‘निगेटिव्ह’ आले आहेत त्यांना गृह अलगीकरणअंतर्गत घरी पाठविण्यात येणार आहे.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला जिल्ह्यात १४ व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून, एकूण कोरोना संदिग्ध रुग्णांपैकी ७८ रुग्णांना १४ दिवसांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यातील ज्या रूग्णांचे नमुने दुसऱ्यांदा ‘निगेटिव्ह’ आले आहेत त्यांना गृह अलगीकरणअंतर्गत घरी पाठविण्यात येणार आहे.जिल्ह्यात कोरोनाचा विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विलगीकरण आणि अलगीकरण असे वेगवेगळे कक्ष तयार केले आहेत. अलगीकरण कक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाच्या कृ षक भवनात तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी ७८ संदिग्ध कोरोना रुग्णांना ठेवण्यात आले असून, महानगरपालिकेचे डॉ. फारूक यांच्या देखरेखीत या रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी नीलेश अपार हे दररोज येथे भेट देत असून, रुग्णांना दिलासा देत आहेत. गुरुवार, १६ एप्रिल रोजी यातील ३ रुग्णांना घरी पाठविण्यात आले. त्यांच्या हातावर ‘होम क्वारंटीन’चा शिक्का मारण्यात आला आहे. तसेच त्यांच्या राहत्या घरावर नोटीस लावण्यात आली आहे. शुक्रवारी यातील २ रूग्णांना घरी पाठविण्यात येणार आहे.जेवण व वैद्यकीय सेवायेथे ‘इन्स्टिट्युशल क्वारंटीन’ ठेवण्यात आलेल्या महिला, पुरुष, मुलांना प्रशासनाच्यावतीने दोन वेळचे भरपूर जेवण सकाळचा अल्पोपाहार, ४ वाजता चहा आदीची व्यवस्था करण्यात आली आहे.

कृ षक भवनात जिल्ह्यातील कोरोना संदिग्ध रुग्णांना ठेवण्यात आले आहे. शुक्रवारीच ३२ जणांचे पुन्हा ‘स्वॅब’ नमुने घेतले जाणार आहेत. ज्यांना घरी पाठविण्यात येत आहे, त्याच्या हातावर शिक्के व घरावर नोटीस लावली जाणार आहे. ते बरे झाले असले तरी १४ दिवस त्यांनी घरीच राहावे, हा उद्देश आहे. 

- नीलेश अपार, उपविभागीय अधिकारी, अकोला.

रुग्णाची येथे काळजी घेण्यात येत असून, ज्यांना घरी पाठविण्यात येत आहे, ते रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे गावातील नागरिक, शेजाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे, रुग्णाने १४ दिवस घराच्या बाहेर पडू नये, हे त्यांना इथे समजावून सांगण्यात आले आहे.- डॉ. फारुख, आरोग्य विभाग, महापालिका, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या