शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ५00 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; १,२५५ खाटांचे नियोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 10:26 IST

जीएमसीसह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी १,२५५ खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घातले असून, पहिल्यांदाच कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५५ वर पोहोचली आहे. रुग्णवाढीचा बहुतांश भार सर्वोपचार रुग्णालयावर पडत असला, तरी आरोग्य विभागामार्फत ८२५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. म्हणजेच जीएमसीसह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी १,२५५ खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असून, कोरोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा ३,०९७ वर पोहोचला आहे. यामध्ये अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५५ असून, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पहिल्यांदाच एवढी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यावर पुन्हा कोरोनाचे संकट वाढत आहे. त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून, तालुकास्तरावर कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केल्या जात आहे; मात्र ग्रामीण भागातील बहुतांश गंभीर रुग्णांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले जात आहे. या शिवाय, शेजारील जिल्ह्यातील रुग्णांचाही भार सर्वोपचार रुग्णालयावर पडत आहे. त्यामुळे खाटांची समस्या उद््भवत आहे. असे असले, तरी आरोग्य विभागामार्फत मूर्तिजापूर, अकोट, बाळापूर आणि या ठिकाणी लक्षणे नसणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

तरी जीएमसीवर रुग्णसंख्या वाढीचा भार!सर्वोपचार रुग्णालय वगळता रुग्णांसाठी इतरत्रही खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी गंभीर रुग्णांसाठी आवश्यक उपाययोजना नसल्याने बहुतांश रुग्णांची धाव सर्वोपचार रुग्णालयाकडे आहे. या शिवाय आवश्यक सुविधा आणि डॉक्टरांची उपलब्धता असल्याने बुलडाणा, वाशिमसह जवळपासच्या जिल्ह्यातील गंभीर रुग्णदेखील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याचे वास्तव आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढ आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे. त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग तयारीला लागला असून, जीएमसी वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास आणखी खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या