शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

CoronaVirus : अकोल्यात आणखी १७ रुग्ण वाढले; रुग्णसंख्या २७८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:27 IST

मंगळवार, १९ डिसेंबर रोजी यामध्ये आणखी १७ जणांची भर पडली आहे.

ठळक मुद्दे मंगळवारी प्राप्त झालेल्या २०० अहवालांपैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७८ वर.सोमवारी रात्री २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला : कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी अकोला जिल्ह्यात दोन दिवसांचा संपूर्ण ‘लॉकडाउन’लागू झाला असताना, कोरोनाबाधितांची संख्या मात्र कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, १९ डिसेंबर रोजी यामध्ये आणखी १७ जणांची भर पडली आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या २०० अहवालांपैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७८ वर पोहचली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ११६ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. विदर्भात नागपूरनंतर अकोला शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या दिवसाकाठी दुहेरी आकड्याने वाढत आहे.   मंगळवारी २०० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १८३ निगेटिव्ह, तर १७ पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये १० पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे.  यामध्ये चार जण हे भीम चौक अकोट फैल येथील आहेत. तर उर्वरित रुग्ण हे  सोनटक्के प्लॉट जुने शहर,  सिंधी कॅम्प,  मुजप्फरनगर लकडगंज,  आंबेडकरनगर- बसस्टँड मागे,  फिरदौस कॉलनी,  दगडी पूल, बैदपूरा,  आदर्श कॉलनी-सिंधी कॅम्प,  अकोली बुद्रुक- गीतानगर,  हाजीनगर- अकोट फैल, व्हीएचबी कॉलनी- रतनलाल प्लॉट, मोमीनपुरा -ताजनापेठ, रंगारहट्टी बाळापुर येथील रहिवासी आहेत. या नव्या पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडल्याने एकूण रुग्णांची संख्या २७८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताची आत्महत्या आहे. तर आतापर्यंत १४४ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  सद्या ११६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सोमवारी रात्री २३ जणांना डिस्चार्जसोमवारी रात्री आणखी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  या सर्वांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. यातील  आठ  जण खैर मोहम्म्द प्लॉट येथील, तर तीन जण आंबेडकर नगर, तीन जण रामनगर सिव्हील लाईन्स येथील आहेत. उर्वरीत  जुना आळशी प्लॉट,  माळीपुरा,  फिरदौस कॉलनी,  गोकुळ कॉलनी,  तारफैल, भीमनगर,  सराफा बाजार, जुनी शहर पोलीस चौकी, अकोट फैल  या भागातील रहिवासी आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत १४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

प्राप्त अहवाल-२००पॉझिटीव्ह-१७निगेटीव्ह-१८३

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल - २७८मयत-१८(१७+१),डिस्चार्ज - १४४दाखल रुग्ण(अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ११६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला