शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘होम क्वारंटीन’मधून १६ मुक्त; १७ जणांवर 'क्वारंटीन'चा स्टॅम्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 10:55 IST

१७ जणांच्या हातावर होम क्वारंटीन असल्याचे स्टॅम्प मारण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

अकोला : विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या ४७ जणांची आरोग्य विभागाकडे नोंद असून, त्यापैकी १६ जणांची ‘होम क्वारंटीन’मधून सुटका करण्यात आली आहे. शिवाय, १७ जणांच्या हातावर होम क्वारंटीन असल्याचे स्टॅम्प मारण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.कोरोनाच्या पृष्ठभूमीवर विदेशातून येणाºया प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जात आहे. आतापर्यंत विदेशातून आलेल्या ४७ जणांची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. त्यापैकी तिघांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित बहुतांश व्यक्तींना ‘होम क्वारंटीन’मध्येच ठेवण्यात आले होते. त्यानुसार, या नागरिकांना १४ दिवसांसाठी ‘होम क्वारंटीन’मध्ये राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या होत्या. गुरुवारपर्यंत त्यापैकी १६ व्यक्तींनी हा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांना ‘होम क्वारंटीन’मधून मुक्त करण्यात आले. उर्वरित ३१ जणांना होम क्वारंटीनमध्ये ठेवण्यात आले असून, त्यातील १७ जणांच्या हातावर शिक्के मारण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.तिघांशी अद्याप संपर्क नाही!विदेशातून आलेल्या ४७ व्यक्तींशी आरोग्य विभागाचा संपर्क झाला आहे; मात्र याव्यतिरिक्त आणखी तिघांचा संपर्क झालेला नाही. त्या व्यक्तींचा संपर्क क्रमांक लागत नसल्याने आरोग्य यंत्रणेपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही व्यक्तींचे पासपोर्ट मागविण्यात येणार असून, त्याआधारे त्यांचा शोध घेणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला