CoronaViru in  Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; २२ नवे पॉझिटिव्ह, ४४ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 06:05 PM2020-10-07T18:05:56+5:302020-10-07T18:06:05+5:30

CoronaViru in  Akola : २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७७१३ झाली आहे.

CoronaViru in Akola: Death of both in a day; 22 new positive, 44 coronal free | CoronaViru in  Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; २२ नवे पॉझिटिव्ह, ४४ कोरोनामुक्त

CoronaViru in  Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; २२ नवे पॉझिटिव्ह, ४४ कोरोनामुक्त

Next

अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. बुधवार, ७ आॅक्टाबर रोजी अकोला शहरातील एक व दहीहांडा येथील एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४८ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७७१३ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २०१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर, मलकापूर, तापडिया नगर व पारद ता. मूर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, जठारपेठ, न्यू भीमनगर, लेबर कॉलनी, गजानन नगर, गांधीग्राम, वरूर जाऊळका ता.अकोट, आलेगाव ता. पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी जठारपेठ, मलकापूर, कौलखेड, सिंदखेड, खडकी व वाडेगाव येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

महिला व पुरुषाचा मृत्यू
कोरोनामुळे बुधवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये कृषी नगर , सिव्हील लाईन येथील ४३ वर्षीय महिला व दहीहंडा येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे २४ व २६ सप्टेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

२२ जणांना डिस्चार्ज
बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १९, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १२, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून १०, कोविड केअर सेंटर हेंडज मुर्तिजापूर येथून एक अशा एकूण ४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


८१२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,७१३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६६५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८१२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: CoronaViru in Akola: Death of both in a day; 22 new positive, 44 coronal free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.