शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

कोरोनाचे आणखी दहा बळी, ५२९ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 17:47 IST

Corona Cases in Akola : शनिवार, १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात आणखी दहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५५५ वर गेला आहे.

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडित होण्याची कोणतीही चिन्हे नसून, शनिवार, १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात आणखी दहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५५५ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३१९ तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये २१० असे एकूण ५२९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३३,१४८ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १५९४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२७५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौल खेड येथील २०, अकोट येथील १६, गोरक्षण रोड येथील १३, मोठी उमरी येथिल १२, मलकापूर येथील नऊ, बालापुर येथील आठ, शिवर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी सात, आदर्श कॉलनी येथील सहा, रणपिसेनगर, व्हीएचबी कॉलनी, सिंधी कॅम्प, डाबकी रोड, येथील प्रत्येकी पाच, गितानगर, पातूर, टाकळी बु., खडकी, राहेर, बेलखेड, जीएमसी येथील प्रत्येकी चार, तेल्हारा, सुधीर कॉलनी, हिंगणा रोड, खेतान नगर, लहान उमरी, जठारपेठ, देशमुख फाईल, लक्ष्मीनगर, पाटीलमंडळी, चोहोट्टा, जांभा खु. येथील प्रत्येकी तीन, व्याळा, रामनगर, गजानन नगर, गणेशनगर, अमानखा प्लॉट, टाकळी खु., शिवापूर, गावंडगाव, दहिगाव, तुकाराम चौक, अंबिका नगर, जवाहर नगर, उगवा, जीएमसी गर्ल होस्टेल, तोष्णिवाल ले आऊट, पारस, रतनलाल प्लॉट, राऊतवाडी, तापडीयानगर, गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी दोन, जयरामसिंग प्लॉट, गुरुदेव नगर, दसेरा नगर, पोळा चौक, बाभुळगाव, डोंगरगाव, गोकुळ कॉलनी, माजलपुर दापुरा, बोरगाव मंजू, बोरगाव, भीमनगर, आळशी प्लॉट, दुर्गा चौक, नकाशी, जुना आरटीओ रस्ता, पिंजर, राहित, चांदूर, गोपाळखेड, मोरगाव भाकरे, नविन आरटीओ, केडीया प्लॉट, शास्त्री नगर, सस्ति, सांगवामेळ, शिरताळा, मनब्दा, सहकार नगर, शिवसेना वसाहत, शिवनगर, चिखली, पाचपुळ, मुळशी, विवरा, कृषीनगर, दहिहांडा, शिवनी शिवर, नायगाव, तळेगाव बाजार, करोडी, वरखेड, खांडकेश्वर वेताळ., विझोरा, चांगेफळ, आगिखेड, शेकापूर, शिर्ला, सिदाजीवेताळ, उमरा, कोठारी, जांब, टाकीया, दानपूर, वरखेड, निंबोरा, खेळ देशपांडे, लोहारी, लाडेगाव, पिंपरी खु., आंबोडा, आळेवाडी, शिवनापूर, कच्ची खोली, आरोग्य कॉलनी, राजीव गांधी नगर, दापोरा, गाडगेनगर, नेहरु पार्क, गायत्री बालिकाश्रम, दत्त कॉलनी, सिद्धार्थ नगर, सोनाळा, कुंभारी, एमआयडीसी४, कोणार, रामदास पेठ, धानेगाव, शेळद, रंभापूर, कासारखेड, दिनोडा, ज्योती नगर, मुंगशी, हातगाव, सुकळी, हरिहरपेठ, रिंगरोड, जुनेशहर, तारफाईल, पोलीस हेड क्वार्टर, चिखलगाव, बंजारा नगर, कळंबेश्वर, अशोकनगर आणि संतोषनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

 

दहा जणांचा मृत्यू

विजय नगर येथील ५१ वर्षीय पुरुष, पळसोबढे येथील ६८ वर्षीय महिला, चिवचिव बाजार येथील ६० वर्षीय महिला, मुर्तिजापुर येथील ६१ वर्षीय महिला, अकोला शहरातील ७० वर्षीय महिला, नगरपरिषद कॉलनी येथील ६० वर्षीय महिला, विवरा येथील २५ वर्षीय महिला,पारस येथील ४० वर्षीय महिला, नगरपरिषद कॉलनी येथील ६५ वर्षीय महिला व शिवसेना वसाहत येथील ६२ वर्षीय पुरुष अशा दहा जणांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली.

४,५७४ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३,१४८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २८,०१९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५५५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,५७४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला