शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’चे पोलिसांवर संकट; कुटुंबीयही धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 11:10 IST

पोलिसांचा थेट कोरोनाशीच संपर्क येत असल्याची चर्चा सध्या पोलीस खात्यात आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोल्यातील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर पहारा देणाऱ्या पोलिसांवर कोरोनाचे संकट गडद होत असून, केवळ अकोलेकरांच्या निष्काळजीमुळे त्यांच्या कुटुंबीयांवरही धोक्याचे सावट आहे.शहरातील प्रत्येक चौकात तसेच कंटेनमेंट झोनमध्ये सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पोलिसांचा थेट संपर्क आता कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळलेल्या रुग्णांच्या सहवासात असलेल्या नागरिकांशी येत आहे. कंटेनमेंट झोन किंवा शहराच्या इतर भागातील नागरिक विविध कारणे शोधून विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे पोलिसांनी पकडल्यानंतर उघडकीस येत आहे. अशाच विनाकारण फिरणाऱ्यांची तब्बल २ हजार ५०० पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत.विनाकारण रस्त्यावर फिरणारे हे कोरोनाचे वाहक ठरू शकतात. पर्यायाने पोलिसांनाही कोरोनाचा धोका निर्माण करीत आहेत.

लक्षणे नसलेल्यांना कोरोनाचा धोकाराज्यातील पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यानंतर यामधील बहुतांश पोलिसांना कोरोनाची लक्षण नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अकोला पोलिसांनाही अशाच प्रकारे लक्षणे नसलेल्या कोरोनाची प्रचंड भीती असून, त्यांनी आरोग्य तपासणी करण्याची मागणी केली आहे. मनपा अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे; मात्र अकोला पोलिसांचा थेट संपर्क येत असतानाही त्यांची आरोग्य तपासणी नाही.

शेकडो अकोलेकरांशी थेट संपर्कभाजी बाजार, किराणा दुकाने, मेडिकल, दवाखाने तसेच कंटेनमेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळलेल्या परिसरात पोलिसांचा थेट कोरोनाशीच संपर्क येत असल्याची चर्चा सध्या पोलीस खात्यात आहे; मात्र त्यानंतरही या पोलिसांना कोणतीही सुरक्षा नसल्याचे वास्तव आहे. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्यापासून ते पोलीस शिपायापर्यंत सर्वच पोलीस कोरोनाशी लढा देत आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस