कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव पाहता मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात; परंतु सध्या लग्न समारंभ जवळपास रद्द करण्याची वेळ पालकांवर येऊन ठेपली आहे. परिणामी, लग्न समारंभाचे सर्व व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. लग्न समारंभात सुखाचे क्षण टिपणाऱ्या छायाचित्र व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय ठप्प पडल्याने छायाचित्रे काढण्यासाठी वापरण्यात येणारी महागडी उपकरणे शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे शासनाने लग्नसमारंभात छायाचित्रकारांना परवानगी देण्याची मागणी नारायण सोनोने, चेतन महल्ले, राजू साबळे, प्रकाश तायडे, अशोक तायडे, संतोष सोनोने, सावन गवई, प्रमोद बेलोकार, गणेश महल्ले, सतीश गायकवाड, रूपराव तायडे, जयंत अंभोरे, प्रल्हाद चौके, प्रमोद मोरे, अमोल हातोले, संकेत सुरवाडे, नीलेश इंगळे, विशाल खंडारे, सतीश कांबळे, सचिन तामसकर, अनुप तायडे, विकास सोनोने, राहुल सोनोने आदींनी केली आहे.
कोरोनाचा फटका: छायाचित्रकार आर्थिक अडचणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST