शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : अकोल्यासाठी लसीचे आणखी १४ हजार डोस प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 10:36 IST

Corona Vaccine: कोविशिल्ड लस उपलब्ध झाल्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अकोला : कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्याला शुक्रवारी आणखी १४ हजार ८६० डोस प्राप्त झाले. यामध्ये कोव्हॅक्सिनचे २ हजार ८६०, तर कोविशिल्डच्या १२ हजार डोसचा समावेश आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर कोविशिल्ड लस उपलब्ध झाल्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. मात्र, मध्यंतरी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला होता. कोविशिल्ड लसीचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने केवळ दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात होते. त्यामुळे ज्यांना कोविशिल्ड लस घ्यायची आहे, अशांना लसीच्या पहिल्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे. जिल्ह्यासाठी शुक्रवारी लसीचे १४ हजार ८६० डोस उपलब्ध झाले आहेत. यामध्ये कोविशिल्ड लसीचा साठा जास्त असल्याने आता पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थींना लस मिळणे शक्य झाले आहे.

 

विभागासाठी १ लाख ७७ हजार डोस प्राप्त

जिल्हा - उपलब्ध लस

- कोव्हॅक्सिन - कोविशिल्ड

अकोला - २८६० - १२०००

अमरावती - १०२०० - ३१०००

बुलडाणा - १३००० - ३३०००

वाशिम - १६००० - १६०००

यवतमाळ - ८५०० - ३५०००

कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत शुक्रवारी विभागासाठी लसीचे १ लाख ७७ हजार ५६० डोस प्राप्त झाले. उपलब्ध लसीचे वितरण पाचही जिल्ह्यांमध्ये करण्यात आले. त्यामुळे लसीकरणाचा वेग कायम राहणार आहे.

- राजेंद्र इंगळे, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी, अरोग्य विभाग

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAkolaअकोला