सेंट ॲन्स शाळेत पक्ष्यांसाठी पाणपोई
मूर्तिजापूर : येथील सेंट ॲन्स हायस्कूलमध्ये मूर्तिजापूर स्वच्छता अभियानाच्या वतीने पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका सिस्टर रिता, सिस्टर मेघा, शिक्षक ज्ञानेश ताले, ओल्गा मोहोड, अंजली चरडे, वर्षा मेहकरे, राजमनी अय्यर, सिस्टर रोज, पूनम वारे, पूजा ठाकूर, वैशाली गुल्हाने, अनुराधा मानकर, आदी उपस्थित होते.
आगर येथे कोरोना जनजागृती मोहीम
आगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, उरळचे ठाणेदार अनंत वडतकार यांनी मंगळवारी आगर गावासह परिसरात फिरून कोरोनाची जनजागृती केली. कोरोना जनजागृती फलकाचे अनावरण केले. यावेळी ज्ञानेश्वर काळणे, रामदास भिसे, सुनील फुकट, सचिन गायकवाड, देविदास जगदाळे, श्रीकृष्ण फुकट, गणेश फुकट उपस्थित होते.
नवनियुक्त पीएसआय भारती मामनकार यांचा सत्कार
माझोड : माझोड येथील पहिल्या पीएसआय भारती मामनकार यांचा ३ एप्रिल रोजी गजानन महाराज मंदिर प्रांगणात सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पुष्पा बोबडे, राजेश ठाकरे, पोलीस पाटील शंकर ढोरे, विनोद ताले, प्रकाश ताले, तुळशीराम मामनकार, पुंडलिक मामनकार, उपसरपंच शिवलाल ताले, सदस्य ज्योती लाहुडकार, विपुल खंडारे उपस्थित होते.
बोरगाव मंजू येथे नियमांचा फज्जा
बोरगाव मंजू : गावातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही नागरिक बेफिकीर होत वावरताना दिसत आहेत. गावात मंगळवारी आठवडी बाजार होता. बाजारात या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
राममंदिर निधी अभियानाचा समारोप
हिवरखेड : हिवरखेड येथे १५ जानेवारीपासून सुरू असलेल्या श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण अभियानाचा समारोप करण्यात आला. गावातून ४ लाख ११ हजार रुपयांचा निधी संकलित करण्यात आला. यावेळी कोषप्रमुख जितेंद्र लखोटिया, अभियान प्रमुख दीपक बोहरा, देवेंद्र राऊत, पंकज टावरी, मनोज राठी, प्रशांत कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
‘पोलीस आपल्या दारी’ मोहिमेला प्रतिसाद
बार्शीटाकळी : तालुक्यातील दोनद खु. येथे पिंजर पोलिसांच्या वतीने ‘एक गाव, एक पोलीस’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी पीएसआय विकास राठोड, बिट जमादार महादेव सोळंके यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्षांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कुटुंब वित्तसाहाय्य योजनेतून मदत
बार्शीटाकळी : राष्ट्रीय कुटुंब वित्त साहाय्य योजनेतून तालुक्यातील १५ लाभार्थ्यांना २० हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. या योजनेतून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास, शासनाकडून २० हजार रुपयांची मदत देण्यात येते.
किरकोळ वाद, एकजण जखमी
तेल्हारा : तालुक्यातील राणेगाव येथे ५ एप्रिल रोजी रात्री समाधान तुळशीराम पाटोळे (वय ४५) यांना आरोपी प्रदीप श्रीधर कुकडे याने किरकाेळ वादातून काचेची बाटली डोक्यावर मारून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
साेयाबीन सहा हजार पार
पिंजर : गत काही दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढले आहेत. साडेपाच हजार रुपयांवरून सोयाबीनचे दर सोमवारी (दि. ५) सहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. सोयाबीनचे दर वाढत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही, त्यांना भाववाढीचा फायदा होत आहे.
शिर्ला येथील वृद्ध दाम्पत्याला मदत
शिर्ला : शिर्ला येथील आगग्रस्त सावजी रामचंद्र बळकार यांच्या कुटुंबाला तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली पटवारी मिलके यांनी पाच हजार रुपयांची मदत दिली. ५ एप्रिल रोजी बळकार यांच्या घराला आग लागून धान्यासह साहित्याचे नुकसान झाले होते.