शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ‘गावाकडे’ : दहा दिवसांत २६६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 10:43 IST

गत दहा दिवसांत जिल्हाभरात आढळलेल्या एकूण ४२४ रुग्णांपैकी तब्बल २६६ रुग्ण हे तालुक्याची शहरे व ग्रामीण भागातील आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात गत चार महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, संपूर्ण जिल्हाच कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. जून महिन्यापर्यंत किरकोळ अपवाद वगळता प्र्रामुख्याने अकोला शहरापुरत्या मर्यादित असलेल्या कोरोनाने ग्रामीण भागात हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, गत दहा दिवसांत जिल्हाभरात आढळलेल्या एकूण ४२४ रुग्णांपैकी तब्बल २६६ रुग्ण हे तालुक्याची शहरे व ग्रामीण भागातील आहेत. याच कालावधीत अकोला शहरात १५८ रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळल्याचे दिसून येत आहे.पश्चिम विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मंगळवार, २८ जुलैपर्यंत एकूण रुग्णसंख्या २,४९६ झाली असून, मृतांचा आकडाही १०३ वर गेला आहे. एप्रिल महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आलेल्या अकोल्यात गत मे महिन्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. जून महिन्यात ‘अनलॉक’नंतर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. सुरुवातीला अकोला शहरातील बैदपुरा, अकोट फैल, सिंधी कॅम्प, फिरदौस कॉलनी या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्यामुळे हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अकोला शहरातील रुग्णवाढीला किंचितसा ‘ब्रेक’ लागला आहे. दरम्यान, याच कालावधीत ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी मोहीम सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५,८६५ रॅपिड चाचण्या झाल्या असून, यामध्ये ३०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १९ जुलै ते २८ जुलै या दहा दिवसांचा विचार केल्यास या कालावधीत एकूण ४२४ रुग्ण आढळून आले असून, यापैकी ग्रामीण भागात २६६, तर अकोला शहरात १५८ रुग्णांची नोंद झाली आहे. अकोला शहरातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाल्याने अकोलेकरांसाठी ही दिलासा देणारी बाब असली, तरी गाफील न राहता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

पातूर-बाळापुरातही कहरजिल्ह्यात अकोला शहरानंतर सर्वप्रथम पातूर शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. अजूनही पातूर तालुक्यात रुग्ण आढळून येत आहेत. बाळापूर शहरही कोरोनाचे केंद्र बनले असून, बाळापूरात आतापर्यंत १०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ११ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तेल्हारा तालुक्यातही आतापर्यंत ३७ रुग्ण आढळले आहेत.

अकोट तालुका नवा हॉटस्पॉटजुलै महिन्यात अकोट शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. तालुक्यात आतापर्यंत २०४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अकोट शहरातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या