शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात झाल्या १८ हजारांवर कोरोना चाचण्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 10:46 IST

जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असला, तरी एकूण १८,५४१ चाचण्यांपैकी ८८.५३ टक्के संदिग्ध रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असला, तरी एकूण १८,५४१ चाचण्यांपैकी ८८.५३ टक्के संदिग्ध रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण चाचण्यांच्या तुलनेत ११.६४ टक्क्यांवर आहे. मृत्युदर मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असून, ४.९८ वर पोहोचला आहे. त्यामुळे एकदम घाबरून न जाता, थोडीशी खबरदारी घेतल्यास जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यास नक्कीच यश येईल.अकोल्यात मे आणि जून या दोन महिन्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला. जुलै महिन्यात हा वेग आणखी वाढत गेला; मात्र महापालिका क्षेत्रात गत काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा वेग मंदावला. आता ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढत असून, चाचण्यांचा वेगही वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या चाचणीला सुरुवात झाली. सुरुवातीला नागपूर येथील लॅबमधून, तर नंतर १२ एप्रिलपासून अकोल्यातच व्हीआरडीएल लॅबमधून चाचण्या घेण्यात आल्यात.जिल्ह्यात व्हीआरडीएल लॅबमध्ये आतापर्यंत १६,५४९ संदिग्ध रुग्णांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी २,००५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. म्हणजेच १२.११ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर ४.९८ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. गत आठवड्यापासून चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्या असून, त्यापैकी १२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत.रुग्ण बरे होण्याचा दर ७९.१५ टक्केकोरोना रुग्णांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १,६८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ही संख्या एकूण रुग्णांच्या ७९.१५ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे होणाºया रुग्णांचा दरही चांगला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या