शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तीजापूरात मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; अंत्ययात्रेत शेकडो झाले होते सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 16:16 IST

अहवाल १६ मे रोजी संध्याकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देराजकीय क्षेत्रातील व्यक्तीमत्व असल्याने त्याच्या अंत्ययात्रेत गर्दी जमली होती. अनेकांना कॉरंटीन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मूर्तिजापूर : येथील पठाणपुरा भागात राहणाऱ्या एका रुग्णाला सुरुवातीला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने १३ मे रोजी अकोला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच दिवशी मृत्यू झाला. दरम्यान त्याचे 'स्वॅब' नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल १६ मे रोजी संध्याकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.आतापर्यंत तालुक्यात एकही बाधित रुग्ण नसल्याने कोरोना संबंधी हा तालुका 'सेफ' होता. मात्र, मुर्तिजापूरच्या कोरोनामुक्तीच्या लढ्याला प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचा आणि हलगर्जीपणा भोवला आहे. १३ मे रोजी शहरातील एका संशयित रूग्णाचा अकोला जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रूग्णाचे 'स्वॅब' तपासणीसाठी पाठवले होते. मात्र, हा रूग्ण दगावला असताना याचा अहवाल तातडीने बोलावून तो कसा येतो याची शहानिशा करुनच रूग्णालय प्रशासनाने वैद्यकीय अहवालात नंतरच मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करायला हवा होता. परंतु तसे न करता रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांना कसा सुपूर्द केला हाच संशोधनाचा विषय ठरला आहे. मृतक हा शहरातील राजकीय क्षेत्रातील व्यक्तीमत्व असल्याने त्याच्या अंत्ययात्रेत संचारबंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. ५०० ते ७०० लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. या अंत्ययात्रेत अंत्यसंस्कारावेळी कोणतीही विशेष काळजीही घेतल्या गेली नव्हती. त्यामुळे रुग्ण असताना व मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्यांचा आकडा हजाराच्यावर आहे. संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे आता मोठी डोकेदुखी ठरली असली तरी अनेकांना कॉरंटीन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात पोलीस, नगर परिषद, प्रशासनातील अधिकारी, नगरसेवक व कर्मचाºयांचा समावेश आहे. १६ मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी, डॉ. अर्जुन भोसले, उपविभागीय अधिकारी अभयसींह मोहिते, तहसीलदार प्रदीप पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र नेमाडे यांच्या सह संबंधित विभागाचे कार्यकारी कामाला लागले आहेत.(शहर प्रतिनिधी)

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMurtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला