शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात कोरोनाचा उद्रेक: एकाच दिवशी पाच मृत्यू, २२ पॉझिटिव्ह, हजाराचा टप्पा ओलांडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:21 IST

रविवार, १४ जून रोजी अकोला शहरातील चार तर बाळापूरातील एक अशा एकूण पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

ठळक मुद्देकोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५१ वर पोहचला आहे. एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ.एकूण रुग्णसंख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ वर गेली आहे.

अकोला : कोरोना या संसर्गजन्य आजाराने अकोल्यात प्रचंड धुमाकुळ घातला असून, या जीवघेण्या आजारामुळे बाधित होणाऱ्यांसह मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, १४ जून रोजी अकोला शहरातील चार तर बाळापूरातील एक अशा एकूण पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५१ वर पोहचला आहे. तर एकूण रुग्णसंख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ वर गेली आहे. कोरोनामुळे एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जिल्हा हादरला आहे.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोला शहरात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागातही आता झपाट्याने प्रसार होत असून, बाळापूर शहरही नवे हॉटस्पॉट होण्याची चिन्हे आहेत. अकोल्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ४६ होता. रविवारी यामध्ये तब्बल पाच जणांची भर पडत हा आकडा ५१ वर पोहचला आहे. रविवारी, अकोट फैल भागातील ६८ वर्षीय महिला, शंकर नगर येथील ५३ वर्षीय पुरुष, बाळापूर येथील ५५ वर्षीय महिला, बापूनगर येथील ५८ वर्षीय पुरुष व सिंधी कॅम्प येथील ५६ वर्षीय पुरुष अशा पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. सिंधी कॅम्प येथील मृत रुग्ण हा खासगी इस्पितळात उपचार घेत होता. तेथे शनिवारी सायंकाळी त्याचे निधन झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आणखी २२ पॉझिटिव्हशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी एकूण ९३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७१ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सात महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मोठी उमरी येथील दोन, शंकर नगर येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन, सिंदखेड येथील दोन, तर उर्वरित शिवाजीनगर, देवी खदान, गाडगे नगर, नवाबपूरा, खेडेकर नगर, खदान, भांडपुरा, अकोट फैल, तार फैल, गायत्री नगर, गुलजार पुरा,वाडेगाव व बाळापूर येथील रहिवासी आहेत. आजच्या अहवालातील एक रुग्ण हा मंगरूळ पीर जि.वाशीम येथील असून तो वाशीम जिल्हा रुग्णालयातून संदर्भित आहे. त्याचेवर अकोला येथेच उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत ६२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सद्यस्थितीत ३३१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. प्राप्त अहवाल-९३पॉझिटीव्ह-२२(२१+१)निगेटीव्ह-७१

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-१००७मयत-५१(५०+१),डिस्चार्ज-६२५दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला