शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाधार’च्या विद्यार्थ्यांना ‘कोरोना’चा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 10:45 IST

मंजूर निधीच्या तुलनेत कमी निधी मिळाल्याने, ‘स्वाधार ’ योजनेच्या राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनामार्फ त अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली असली तरी, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर वित्त विभागाच्या निर्णयानुसार या योजनेत मंजूर तरतुदीपैकी केवळ ३५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याचा आदेश शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून २८ आॅगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला. मंजूर निधीच्या तुलनेत कमी निधी मिळाल्याने, ‘स्वाधार ’ योजनेच्या राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत इयत्ता दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी अनुसूचित जातीमधील ज्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरील शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळू शकला नाही, अशा विद्यार्थ्यांना निवास, भोजन भत्ता आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रतिवर्ष ४३ हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येते.या पृष्ठभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनामार्फत अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. परंतु कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ३३ टक्के निधी वितरीत करण्याच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार मंजूर निधीतील ३५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश २८ आॅगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला.स्वाधार योजनेंतर्गत राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी उपलब्ध निधी तोकडा ठरणार असल्याने, योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागणार आहे.

जिल्हानिहाय निधी खर्च सादर करावा लागणार!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेला ३५ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील सर्वच जिल्हास्तरावरील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयांना वितरित करण्यात येणार आहे.

निधी उपलब्ध झाल्यानंतर जिल्हानिहाय निधी खर्च आणि विद्यार्थी संख्या व उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचनाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आदेशात देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीgovernment schemeसरकारी योजना