शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : सरकारने हिंमत देण्याऐवजी भीती दाखविली - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 18:40 IST

सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

अकोला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जागतिक महामारीचे स्वरूप धारण केल्याचे चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून लॉकडाऊनसारखा मार्ग निवडला गेला. गेल्या तीन महिन्यात सरकारने नागरिकांना हिंमत देण्याऐवजी प्रत्येक दिवशी नागरिकांसमोर भीतीचे वातावरण तयार करून इतर मुद्यांवरील अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था कोरोनाच्यापूर्वीच धोक्यात आली होती. आता कारोनाचे निमित्त पुढे करून सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.अ‍ॅड. आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून या सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसल्याचे स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या नावावर या सरकारने स्थलांतरित मजुरांचे हाल केले. तब्बल १५ कोटी मजूर उपाशीपोटी पायीपायी आपल्या घराकडे परतले. कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षाही या मजुरांची वेदना मोठी आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून केवळ कोरोनाच्याच भोवती शासन व प्रशासन फिरवित ठेवत इतर आघाड्यांवर सरकारला आलेले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. कोरोनाची रुग्णसंख्या कमी असताना लॉकडाऊन कडक व आता रुग्णांची संख्या वाढत असतानाच अनलॉकची प्रक्रिया वेगात असा विरोधाभासी निर्णय घेणारे सरकार कोरोनाची खरी आकडेवारीही लपवित असून, नागरिकांची दिशाभूल सुरू असल्याचेही ते म्हणाले. केंद्र शासन निर्णय घेत नाही. राज्य शासनाला निर्णयाचे अधिकार देते. राज्य शासन स्थानिक प्रशासनाला अधिकार देते व प्रशासनात समन्वय नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर