शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेह, हृदयविकार रुग्णांसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:17 IST

बहुतांश रुग्णांना मधुमेह, हृदयविकारासह उच्च रक्तदाब आणि इतर आजारांची समस्या होती.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, दोन महिन्यात कोरोना बाधितांचा आकडा ७९५ वर पोहोचला आहे, तर ३७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश रुग्णांना मधुमेह, हृदयविकारासह उच्च रक्तदाब आणि इतर आजारांची समस्या होती. अशा परिस्थितीत नागरिकांनी वयोवृद्धांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.जिल्ह्याचा रेड झोनमध्ये प्रवेश झाल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शिवाय, मृत्यूदरही वाढला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी १४ एप्रिल रोजी गेला होता. तत्पूर्वी ११ एप्रिल रोजी ३१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने सर्वोपचार रुग्णालयात आत्महत्या केली होती. ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे केवळ चार बळी गेले होते; मात्र मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोनाने आणखी एक बळी घेतला. मृत्यूचे हे सत्र मे महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरूच राहिले. धक्कादायक बाब म्हणजे मे महिन्यात दर दिवसाआड एकाचा बळी गेला आहे. तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे; परंतु मृतकांमध्ये इतरही आजारांच्या समस्या असल्याचे आतापर्यंतच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. गत दोन महिन्यांच्या कालावधीत ३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील २१ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. ही चिंतेची बाब असून, वयोवृद्धांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.मृतकांना होते हे आजारकोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण हे ४० ते ८० वयोगटातील आहेत. यातील बहुतांश रुग्णांना उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह यासह निमोनिया आदी आजारांच्या समस्या होत्या. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वच वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण झालेली आहे. मृतकांमध्ये ५० पेक्षा जास्त वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त असून, त्यांना इतरही आजारांच्या समस्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी कुटुंबातील वयोवृद्ध सदस्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाdiabetesमधुमेह