शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : चिनी खेळण्यांची २० कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:50 IST

अकोल्यातून दर महिन्याला होणारी २० कोटींची उलाढाल अचानक ठप्प पडली आहे.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेकडो नागरिकांचा बळी घेणाऱ्या चीनमधीलकोरोना व्हायरसने जग हादरले आहे. त्याचा परिणाम आता भारतातील विविध क्षेत्रावर जाणवू लागला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनची खेळणी आणि वस्तूंची आयात महिन्याभरापासून बंद झाली. त्यामुळे अकोल्यातून दर महिन्याला होणारी २० कोटींची उलाढाल अचानक ठप्प पडली आहे.भारतातील कोणताही सण किंवा उत्सव असो, त्याकरिता लागणारे साहित्य, वस्तू, मूर्ती आणि लहान मुलांची खेळणी यासाठी चिनी उत्पादनाला पसंती दिली जाते. प्लास्टिक निर्मित या वस्तू सुरेख आणि स्वस्त असल्याने अल्पावधीतच भारतातील बाजारपेठेवर चीनने ताबा मिळविला.त्यातल्या त्यात लहान मुलांच्या खेळणीत चीनने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. चीनची खेळणी जगभरात प्रसिद्ध आहे. अकोल्यातही चीनच्या खेळणीला मोठी मागणी आहे. मुंबई आणि नागपुरातून अकोल्यात चिनी वस्तू येतात व येथे १० मोठ्या वितरकांच्या माध्यमातून शहरातील ४०० विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांत त्या पोहोचतात. यावर दर महिन्याला २० कोटींची उलाढाल होते; मात्र जानेवारीच्या प्रारंभापासून चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.शेकडो जण मृत्युमुखी पडले असून, हजारो लोकांना कोरोनाची लागण झाली. चीनमधील अनेक शहरांमध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, तेथील उद्योग-व्यवसाय बंद पडले आहेत. यामध्ये खेळणीच्या निर्मितीच्या कारखान्यांचाही समावेश आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून भारत सरकारने हवाई आणि जहाज मार्गाने होणारी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे चीनमधून येणाºया खेळण्यांची आवक थांबली आहे. जवळपास एक महिन्यापासून चीनची आयात बंद झाल्याने भारतातील उलाढाल ठप्प पडली आहे. मुंबई, नागपूर आणि अकोल्यातील स्टॉकिस्टकडे असलेल्या खेळणी आणि वस्तूंचे भाव ३५ ते ४० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. खेळणीला मागणी कायम असल्याने महागड्या भावातदेखील खेळणी विकल्या जात आहे. स्टॉक संपुष्टात आल्यानंतर मात्र भारतीय खेळणीशिवाय पर्याय नसणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोनाchinaचीन