शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Akola : आणखी सहा जणांचा मृत्यू, ७१८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 19:26 IST

Corona Cases in Akola: ४ मे रोजी जिल्ह्यात आणखी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ७३७ वर पोहोचला आहे.

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडित होण्याची कोणतीही चिन्हे नसून, मंगळवार, ४ मे रोजी जिल्ह्यात आणखी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ७३७ वर पोहोचला आहे, तर गत चोवीस तासात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४८४, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये २३४ असे एकूण ७१७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांचा आकडा ४२,४२७ वर पोहोचला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २२७९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७९५ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील ४८, अकोट तालुक्यातील ६२, बाळापूर तालुक्यातील ३०, तेल्हारा तालुक्यातील ३५, बार्शी टाकळी तालुक्यातील २९, पातूर तालुक्यातील तीन आणि अकोला - २७७ (अकोला ग्रामीण- ६६, अकोला मनपा क्षेत्र- २११) रुग्णांचा समावेश आहे.

येथील रुग्णांचा मृत्यू

पारस ता.बाळापूर येथील ४० वर्षीय पुरुष

पिंजर ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिला

बाळापूर येथील ४६ वर्षीय पुरुष

पारस ता. बाळापूर येथील ४० वर्षीय महिला

लहान उमरी येथील ७५ वर्षीय महिला

वनी रंभापूर येथील ७३ वर्षीय महिला

 

४७५ कोरोनामुक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३६, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील सहा, अकोला ॲक्सीडेंट येथील तीन, देवसार हॉस्पीटल येथील तीन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील दोन, इनफिनिटी हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील पाच, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, फातीया हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, खैर उम्मत हॉस्पीटल येथील दोन, लोहाणा हॉस्पीटल येथील चार, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी तीन, केअर हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, तर होम आयसोलेशन मधील ३८० अशा एकूण ४७५ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

५,६९२ उपचाराधीन रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४२,४२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३५,९९८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,६९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या