शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे आणखी १२ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या २१८४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 11:44 IST

२१ जुलै रोजी कोरोनाचे आणखी १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देएकूण बाधितांची संख्या २,१८४ वर गेली आहे. ३२६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा हैदोस सुरूच असून, दिवसेंदिवस या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, २१ जुलै रोजी कोरोनाचे आणखी १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण बाधितांची संख्या २,१८४ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ११४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पाच महिला व सात पुरुष आहेत. यामध्ये बारगणपुरा अकोट येथील तीन, बोरगाव मंजू येथील तीन, अकोला शहरातील रामनगर येथील दोन, तर उर्वरीत अकोली जहागीर अकोट, जीएमसी, खैर मोहम्मद प्लॉट व जिल्हा कारागृह येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.३२६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरूआतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१८४ असून, यापैकी १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १७५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३२६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला