शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी पदाच्या परीक्षेत कानाला ‘ब्ल्यू टूथ’ लावून कॉपी; परीक्षार्थीस अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 14:12 IST

हर्षल विजय तायडे हा शुक्रवारी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास कानाला मोबाइल ब्ल्यु ट्युथ लावून संगणकावर आॅनलाइन पेपर सोडवित होता.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: तलाठी पदाच्या परीक्षेमध्ये कानाला मोबाइल ब्ल्यू ट्युथ लावून कॉपी करणाऱ्या एका परीक्षार्थीस केंद्र प्रमुखाने पकडून खदान पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून आरसेस इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीच्यावतीने तलाठी पदासाठी आॅनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. शुक्रवारी परीक्षेदरम्यान मलकापूर परिसरातील बालाजी विद्यामंदिर कॉन्व्हेंट येथील केंद्रावर परीक्षार्थी हर्षल विजय तायडे (२०, रा. वडाळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा) हा शुक्रवारी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास कानाला मोबाइल ब्ल्यु ट्युथ लावून संगणकावर आॅनलाइन पेपर सोडवित होता. यावेळी त्याच्या हालचाली संशयास्पद आणि जवळील रुमाल वारंवार कानावर ठेवत असल्याने, केंद्र प्रमुख मोहन कांबळे यांना संशय आला. त्यांनी व केंद्र निरीक्षक विजय खेडकर यांनी त्याची तपासणी केली असता, त्याच्या कानाला मोबाइल ब्ल्यु ट्युथ असल्याचे दिसून आले. मोबाइल ब्ल्यु ट्युथद्वारे हर्षल तायडे हा कॉपी करीत असल्याचे समोर आल्यावर केंद्रप्रमुख मोहन कांबळे यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम ४२०, ६६, डी आयटी अ‍ॅक्ट, परीक्षा अधिनियम ७ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. या प्रकरणाचा तपास कोतवालीचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्याकडे सोपविण्यात आले. न्यायालयाने या परीक्षार्थीची कारागृहात रवानगी केली. (प्रतिनिधी)

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा