शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयांमध्ये लवकरच ‘सीओपीडी’ विशेष केंद्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:14 IST

राज्यभरातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये श्वसनासंबंधी आजार आणि अस्थमा यावर उपचार करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन्यात येणार असल्याची माहिती आहे.

अकोला : श्वसनासंबंधित आजारांवर निदान आणि उपचार होत नाहीत; परंतु या आजारांचे वेळीच निदान आणि उपचार व्हावे, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये श्वसनासंबंधी आजार आणि अस्थमा यावर उपचार करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी राज्य शासनाने पुण्यातील चेस्ट रिसर्च फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भारतात जवळपास ५५ दशलक्ष लोकांना क्रोनिक आॅबस्ट्रक्टीव्ह पल्मोनरी डीसीस (सीओपीडी) म्हणजे श्वसनासंबंधीत आजार आहेत. या आजारांमुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. यामध्ये प्रामुख्याने सतत खोकला येणे, श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येणे, श्वास घेताना त्रास होणे यासारखे सामान्य लक्षणे दिसून येतात; परंतु राज्यातील काही शासकीय रुग्णालये वगळता बहुतांश शासकीय रुग्णालयांमध्ये या आजारांवर स्वतंत्र उपचाराची सुविधा उपलब्ध नाही. श्वसनासंबंधीत आजारांवर रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्येच संपूर्ण उपचार मिळावा, या उद्देशाने राज्यभरात ‘सीपीओडी’चे विशेष केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी राज्य शासनाने पुण्यातील चेस्ट रिसर्च फाउंडेशनसोबतच करार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात टप्प्याटप्प्याने शासकीय रुग्णालयात सीओपीडी विशेष केंद्र सुरू करण्यात येणार आहे.आजाराचे निदान होते, मात्र उपचार नाही!राज्यातील बहुतांश शासकीय रुग्णालयांमध्ये श्वसनासंबंधी आजार तसेच अस्थमाचे निदान तर होते; मात्र त्यावर योग्य उपचार होत नसल्याचे वास्तव आहे; मात्र शासनाच्या पुढाकाराने शासकीय रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यास अनेक रुग्णांना योग्य वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.विदर्भात असणार तीन केंद्रराज्यात काही शासकीय रुग्णालयांमध्ये अशी सुविधा उपलब्ध आहे; मात्र त्यांना अधिक मजबूत करणे गरजेचे असून, या अंतर्गत विदर्भात तीन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.श्वसनासंबंधित आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये सीओपीडीच्या रुग्णांवर उपचार केला जातो.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटल