शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘बाबूगिरी’ला जिल्हा परिषदेत लागणार लगाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:07 IST

कार्यालयातील लिपिक, प्रमुखांकडून प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला जात नाही, पाठपुरावा केल्याशिवाय जनतेची, प्रशासकीय कामे वेळेवर होतच नाहीत,  अशीच प्रतिमा शासकीय कार्यालयांची झाली आहे. जिल्हा परिषदेत यापुढे हा प्रकार बंद करून ‘बाबूगिरी’ ला आळा घालण्यासाठी ‘झिरो पेंडन्सी अँण्ड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती सुरू  केली जाणार आहे.

ठळक मुद्दे‘झिरो पेंडन्सी अँण्ड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती सुरू होणार

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कार्यालयातील लिपिक, प्रमुखांकडून प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला जात नाही, पाठपुरावा केल्याशिवाय जनतेची, प्रशासकीय कामे वेळेवर होतच नाहीत,  अशीच प्रतिमा शासकीय कार्यालयांची झाली आहे. जिल्हा परिषदेत यापुढे हा प्रकार बंद करून ‘बाबूगिरी’ ला आळा घालण्यासाठी ‘झिरो पेंडन्सी अँण्ड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती सुरू  केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये  दोन मोहिमा राबवून प्रलंबित प्रकरणांचा आढावा, तसेच निपटारा करण्यात येत आहे.नागरिकांच्या व प्रशासकीय कामकाजास होणारा विलंब टाळण्यासाठी हे उपक्रम आहेत. त्यातून सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयातील अभिलेख आणि कक्षातील अभिलेखे अद्ययावत केले जाणार आहेत. त्यातील सर्व थकीत प्रकरणांचा निपटारा करणे, विशिष्ट कालर्मयादेत प्रकरणे निकाली काढण्यासाठी ३ ऑक्टोबरपासून हा उपक्रम सुरू करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी दिले. 

दर सोमवारी प्रलंबित प्रकरणांचा आढावा पंचायत समिती स्तरावरून गटविकास अधिकार्‍यांनी सर्वच खातेप्रमुखांचा अहवाल गोळा करून तो मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सादर करावा लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दरमहा आढावा घेऊन त्याचा अहवाल शासनाला सादर करणार आहेत. 

उपमुकाअ कुळकर्णी पदावर असून नसल्यासारखेपहिल्या टप्प्यातील मोहिमेसंदर्भात जाणून घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांच्याशी संपर्क केला असता, ते कधीच कार्यालयात भेटत नाहीत. मोबाइलवर कधी प्रतिसाद देत नाहीत. हा प्रकार जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांसोबत, पदाधिकार्‍यांसोबतही घडत आहे. त्यातून ते कुणालाही जुमानत नसल्याचे किस्सेही पुढे येत आहेत. कार्यालयीन कामकाजाबाबत पदावर असून नसल्यासारखेच ते वागत आहेत.