शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 14:30 IST

अकोला: ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे

अकोला: ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या नवीन वेतनश्रेणीनुसार राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात बीएएमएस कंत्राटी डॉक्टरांची पदभरती करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गत अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत राज्यातील सर्वच कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात वैद्यकीय सेवा पुरवणाºया बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता दुपटीने वाढ करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राज्य सरकारने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (वर्ग-अ) मानधनात वाढ केली आहे; मात्र त्यामध्ये बीएएमएस डॉक्टरांच्या उल्लेख नव्हता. यानंतर बीएएमएस डॉक्टरांकडून रोष व्यक्त करण्यात आला होता. शिवाय, दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्यास अनेकांचा नकारही वाढत होता. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागात बीएएमएस डॉक्टरांची कंत्राटी तत्त्वावर पद भरती करण्यात येणार असून, त्यांना वाढीव मानधन दिले जाणार आहे.सध्याचे मानधन फक्त १५ हजार रुपयेदुर्गम आदिवासी काम करायला एमबीबीएस डॉक्टर तयार होत नसल्याने त्यांच्या जागी सध्या बीएएमएस डॉक्टर कार्यरत आहेत. दोघांच्याही कामाचे स्वरूप सारखेच आहे; मात्र बीएएमएस डॉक्टरांना केवळ १५ ते १६ हजार रुपये मानधनावर रुग्ण सेवा द्यावी लागत आहे. नवीन निर्णयानुसार, बीएएमएस डॉक्टरांना आता ४० ते ४५ हजार रुपये एवढे वाढीव मानधन मिळणार आहे.तर बीएएमएस डॉक्टरांवर टांगती तलवारदुर्गम भागात बीएएमएस डॉक्टरांची पदभरती केल्यावर त्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर मिळाल्यास, येथील बीएएमएस डॉक्टरांची नोकरी धोक्यात येऊ शकते; परंतु एमबीबीएस डॉक्टरांचा रुग्णसेवा देण्यास नकार असल्याने हा प्रकार क्वचितच घडण्यासारखा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.शासन निर्णयानुसार, कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांना वाढीव मानधन मिळणार असून, लवकरच त्यांची नव्याने पदभरती केली जाणार आहे. विभागात २५ ते ३० टक्के पद रिक्त आहेत. या निर्णयामुळे बहुतांश दुर्गम भागात २४ तास एक डॉक्टरची उपलब्धता राहणार आहे, हे विशेष.- डॉ. फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला

 

टॅग्स :Akolaअकोलाdocterडॉक्टर