अकोला : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात झालेल्या दारुण पराभवावर लवकरच कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेनेकडून चिंतन करण्यात येणार आहे. बुथ, तालुका आणि म तदारसंघनिहाय आढावा घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात काही आजी-माजी पदाधिकार्यांनी पक्षविरोधी काम केले होते. चिंतन बैठकीत यावरही चर्चा होणार आहे. जिल्ह्यातील कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेचे सर्वच उमेदवार पराभूत झाले. जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी झाल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि युती तुटल्याने शिवसेना-भाजपने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. यावेळची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती; मात्र कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेतील गट तटाच्या राजकारणाचा उमेदवारांना फटका बसला. त्यामुळे सफाया झालेले तीनही पक्ष आता पराभवाचे विेषण करण्यासाठी बैठका घेणार आहेत. प्रदेश पातळीवरील बैठक निश्चित झाल्यानंतर लगेच जिल्ह्यात बैठक घेण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवावर लवकरच चिंतन
By admin | Updated: October 27, 2014 01:24 IST