शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला  शहरात एकाच वेळी दोन मुख्य मार्गांवर बांधकाम; अकोलेकरांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:43 IST

अकोला: शहरात एकाच वेळी दोन मुख्य मार्गांवर बांधकाम सुरू झाल्याने अकोलेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

अकोला: शहरात एकाच वेळी दोन मुख्य मार्गांवर बांधकाम सुरू झाल्याने अकोलेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी याकडे लक्ष देऊन अकोलेकरांची होत असलेली कोंडी थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.शहरातील नेकलेस रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेहरू पार्क ते दुर्गा चौकपर्यंतचा मार्ग रुंद केला जात आहे. आधी अतिक्रमणामुळे या मार्गांचे बांधकाम थांबले, त्यानंतर पोल शिप्टिंगअभावी बांधकाम थांबले. आता कुठे हे कामदेखील पार पडले. त्यामुळे या मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होत आहे. एकीकडे या मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होत आहे, तर दुसरीकडे जेल चौकापासून तर अग्रसेन चौकापर्यंत उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे. दोन्ही मार्गावर अकोला शहरातील प्रमुख वाहतूक दररोज ये-जा करीत असते. अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेत येण्यासाठी याच मार्गांचा वापर होतो. बसस्थानक आणि रेल्वेस्थानकावर जाण्यासाठीदेखील याच मार्गांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दोन्ही मार्गांचे बांधकाम एकाच वेळी सुरू झाल्याने आता अकोलेकरांची कोंडी होत आहे. महापालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभागाचा असमन्वय यास कारणीभूत ठरत आहे. तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन आधी एका मार्गाचे आणि त्यानंतर दुसºया मार्गाच्या बांधकामाला सुरुवात करायला हवी; मात्र त्याकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसल्याने दोन्ही मार्गावर बांधकाम सुरू झाले आहे. कौलखेड, सिंधी कॅम्प तसेच तुकाराम चौकाकडून रेल्वेस्थानकाकडे जाणाºयांना दुसरा कोणताही जवळचा पर्याय नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी भविष्यात अधिक जटिल झाल्याशिवाय राहणार नाही, असे एकंदरीत चित्र दिसत आहे. भविष्यातील धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने दखल घेत एक मार्ग सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग