शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा स्थगनादेश असतानाही गड्डम प्लॉट येथे बांधकाम  सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 14:29 IST

प्रवीणचंद्र भवानीशंकर त्रिवेदी यांनी परिसरात राजरोस अवैध बांधकाम सुरू ठेवले आहे.

अकोला : स्थानिक मौजे ताजनापूर नझूल शीट क्र. ६२ ए भूखंड क्र. ९/४७ च्या गड्डम प्लॉट येथील जागेच्या बांधकामास नगर रचना विभागाचा स्थगनादेश असतानादेखील प्रवीणचंद्र भवानीशंकर त्रिवेदी यांनी परिसरात राजरोस अवैध बांधकाम सुरू ठेवले आहे. आता अवैध बांधकामाच्या ठिकाणच्या शेजाऱ्यांनी बांधकाम थांबविण्यासाठी रामदासपेठ पोलीस ठाण्यासोबतच न्यायालयात धाव घेतली आहे.गड्डम प्लॉटच्या उपरोक्त ठिकाणी त्रिवेदी यांनी साईड मार्जिन न सोडता बांधकाम सुरू केले असून, त्याची रितसर परवानगी नगर रचना विभागाकडून घेतली नाही, असा आरोप त्यांच्या शेजाºयांनी केला. या बांधकामामुळे शेजारच्या चुना-मातीच्या भिंतीला तडा जात असल्याने येथील बांधकाम थांबविण्यात यावे, अशी मागणी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि आमदारांकडे करण्यात आली. तेव्हा महापालिकेच्या नगर रचना विभागाने बांधकामाची शहानिशा करेपर्यंत बांधकाम थांबविण्यासाठी स्थगनादेश दिला, तसेच बांधकाम केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचे कलम ५२,५३,५४ अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा ६ फेब्रुवारी २० च्या आदेशान्वये दिला. या स्थगनादेशानंतर बांधकाम थांबविण्याऐवजी त्रिवेदी यांनी बांधकाम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे येथील शेजारी गौरीशंकर कलशेट्टी आणि गिरीराजराव यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात आणि न्यायालयात धाव घेतली आहे. जर न्याय न मिळाला तर याप्रकरणी बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी त्रिवेदी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका