शहरं
Join us  
Trending Stories
1
रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
2
मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
3
MNS: राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला गाठलं आणि रस्त्यावरच...
4
"डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ
5
Gautam Gambhir: गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या नावावर 'या' ५ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
6
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार ही मराठी अभिनेत्री? तेलुगु सिनेमात केलंय काम, प्रोमोमुळे चर्चेला उधाण
7
आता Apple नं घेतला कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय; 'या' ५ कारणांमुळे कंपनीनं केली घोषणा
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरील फोटो लीक, रणबीरचा आर्मी लूक तर आलियाने रेट्रो स्टाईलमध्ये वेधलं लक्ष
9
Astrology: गजकेसरी आणि रूचक राजयोग! २५ नोव्हेंबर रोजी 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार!
10
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
11
"माझं काळीज तुटलंय...", स्मशानभूमीबाहेर धाय मोकलून रडली धर्मेंद्र यांची चाहती, काळजाला चर्रर्र करणारा व्हिडीओ
12
चीनमध्ये अरुणाचल प्रदेशातील महिलेसोबत असभ्य वर्तन, आता भारतानेही दिले सडेतोड प्रत्युत्तर
13
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मोठा फेरबदल! लॅरी पेज दुसऱ्या क्रमांकावर; 'ही' व्यक्ती टॉप-१० मधून बाहेर!
14
Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू
15
"वनडेतून निवृत्ती घेऊन त्याने कसोटीत खेळायला हवं होतं"; किंग कोहलीच्या सहकाऱ्याची पोस्ट व्हायरल
16
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
17
विवाह पंचमी २०२५: विवाह पंचमीला रामसीतेचा विवाह, पण इतरांसाठी ही विवाहतिथी निषिद्ध का?
18
"त्यांचं अचूक टायमिंग..", धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस'; सुहासिनी मुळेंनी सांगितली आठवण
19
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
20
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवानगीचा गाेंधळ; ऑफलाइन नकाशे सारले बाजूला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 11:56 IST

Akola Municipal Corporation : शहरातील बांधकाम प्रकल्प रखडण्याची शक्यता असल्याने बांधकाम क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे.

- आशिष गावंडे

अकाेला : राज्य शासनाच्या महाआयटी विभागाकडून तयार करण्यात आलेल्या ‘बीपीएमएस’ प्रणालीमध्ये ऑक्टाेबर २०२० मध्ये बिघाड झाल्यामुळे बांधकाम परवानगीचे नकाशे ऑफलाइन पद्धतीनुसार मंजूर करण्याचे शासनाचे निर्देश हाेते. १४ एप्रिलपासून ‘बीपीएमएस’प्रणाली पुन्हा कार्यान्वित झाली. परंतु त्याआधी मनपाच्या नगररचना विभागाने ऑफलाइन पद्धतीने स्वीकारलेले नकाशे आता प्रशासनाने बाजूला सारल्याची माहिती आहे. यामुळे शहरातील बांधकाम प्रकल्प रखडण्याची शक्यता असल्याने बांधकाम क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे.

महापालिका क्षेत्रात वाणिज्य संकुल, सदनिका तसेच हक्काचे घर बांधण्यासाठी नगररचना विभागाकडून निरनिराळे निकष व नियमावली लागू केली जात असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत हाेता. ही परिस्थिती लक्षात घेता नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर २०२० मध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली (युनिफाइड डीसीआर) ला मंजुरी दिली. यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दरम्यान, नकाशा मंजूर करताना त्यामध्ये एकसूत्रता यावी, यासाठी महाआयटी विभागाने ‘बीपीएमएस’प्रणाली विकसित केली. याद्वारे ऑनलाइन नकाशा सादर केल्यानंतर त्याची तपासणी हाेऊन परवानगी दिली जाते; परंतु या प्रणालीमध्ये ऑक्टाेबर २०२० पासून सतत तांत्रिक बिघाड हाेत असल्याने दुरुस्ती हाेईपर्यंत ऑफलाइननुसार नकाशा मंजूर करण्याचे निर्देश शासनाने नगररचना विभागाला दिले हाेते; परंतु आता अचानक महापालिकेच्या स्तरावर ऑफलाइनची प्रक्रिया पूर्ण केलेले नकाशे बाजूला सारण्यात आल्याची माहिती आहे.

 

१५ एप्रिलनंतर ‘बीपीएमएस’ सुरू

शासनाच्या महाआयटी विभागाने १५ एप्रिलपासून ‘बीपीएमएस’प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर नकाशा मंजुरीसाठी नगररचना विभागाने ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली; परंतु त्यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने स्वीकारलेले प्रस्ताव आता अचानक का बाजूला सारण्यात आले, याबद्दल शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

 

आयुक्तांनी तिढा साेडविण्याची अपेक्षा

ऑफलाइन नकाशा मंजुरीसाठी मागील तीन महिन्यांपासून मनपाचे उंबरठे झिजवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे प्रस्ताव बाजूला सारल्यास त्यांना पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करावे लागतील. यासाठी आणखी दाेन महिन्यांचा कालावधी लागेल. अर्थात, एका प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने मजूर वर्ग स्थलांतरित हाेण्याची शक्यता आहे. यावर आयुक्त निमा अराेरा यांनी मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका