शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हरित संकल्पनेवर आधारित होणार शासकीय इमारतींचे निर्माण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 13:11 IST

अकोला: आगामी दिवसांमध्ये राज्यात शासकीय इमारतींचे बांधकाम हरित संकल्पनेवर (ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट) आधारित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे.

अकोला: आगामी दिवसांमध्ये राज्यात शासकीय इमारतींचे बांधकाम हरित संकल्पनेवर (ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट) आधारित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. यासोबतच शासकीय इमारतींपैकी शासकीय निवासस्थाने, हॉस्पिटल इमारत, शासकीय कार्यालयीन इमारतीमधील कॅन्टीन अशा ठिकाणी सिलिंडरमार्फत गॅस पुरवठा न करता पाइपलाइनद्वारे पुरवठा करण्याचे निर्देश शासनाने जारी केले आहेत.वृक्षांची वारेमाप कत्तल, ध्वनी व जलप्रदूषणामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. ही बाब लक्षात घेता यापुढे राज्यात हरित संकल्पेनवर (ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट) आधारित शासकीय इमारतींचे निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरणाला हानी होणार नाही, अशा पद्धतीने हरित इमारतींचे बांधकाम केले जाणार असून, यामध्ये प्रामुख्याने वीज व पाण्याचा कमीत कमी वापर करून परिसरात वृक्ष लागवड करणे तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा समावेश आहे. उन्हाळ््यात इतर साधारण इमारतींच्या तुलनेत हरित इमारतींचे तापमान १० अंश सेल्सिअसने कमी राहत असल्याची माहिती आहे. आगामी दिवसांमध्ये शासकीय कार्यालयांचे बांधकाम हरित संकल्पनेवर आधारित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे.मागील पाच वर्षांत देशात प्रयोगपर्यावरणाचा ºहास टाळण्यासाठी हरित संकल्पनेवर आधारित इमारतींच्या बांधकामाला २० वर्षांपूर्वी अमेरिका व चीनमध्ये सुरुवात झाली. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात बेंगळुरू, पंचकुला, हैद्राबाद, चंदीगड, भोपाळ, इंदूर आदी शहरात ग्रीन बिल्डिंगच्या बांधकामासाठी पुढाकार घेण्यात आला.यापुढे पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठाशासकीय इमारतींपैकी शासकीय निवासस्थाने, हॉस्पिटल इमारत, शासकीय कार्यालयीन कॅन्टीन आदी ठिकाणी सिलिंडरद्वारे गॅस पुरवठा न करता पाइपलाइनद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका