शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्या बांधकाम, दुरुस्तीची कामे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:22 IST

अंगणवाडी बांधकाम-२८ तर दुरुस्तीच्या ३८४ पैकी २२३ कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर त्यापैकी दुरुस्तीची ८५ तर १० बांधकामेच पूर्ण झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील गावांमध्ये अंगणवाडी इमारत बांधकामासाठी आॅगस्ट २०१९ मध्येच प्रशासकीय मान्यतेचा आदेश दिल्यानंतरही त्या अंगणवाड्यांची कामे सुरू होण्यास प्रचंड विलंब झाला. अंगणवाडी बांधकाम-२८ तर दुरुस्तीच्या ३८४ पैकी २२३ कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर त्यापैकी दुरुस्तीची ८५ तर १० बांधकामेच पूर्ण झाली आहेत.ग्रामीण भागातील अंगणवाड्यांसाठी इमारती नाहीत. त्यामुळे बालकांना खासगी किंवा भाड्याच्या इमारतीमध्ये बसावे लागते. त्यातच बालकांना बसण्याची जागा सुरक्षित नसल्याने त्यांच्या सुरक्षिततेबद्दलही धोका निर्माण होतो. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून दरवर्षी अंगणवाडी बांधकामासाठी निधी दिला जातो. जिल्हा नियोजन समितीने एप्रिल २०१९ मध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी इमारत बांधकासाठी निधी उपलब्ध करून दिला.प्रत्येक इमारत बांधकामासाठी ८ लाख ५० हजार रुपये मंजूर आहेत. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या आराखड्यानुसारच बांधकाम करण्याचेही बजावले. अंगणवाडी बांधकामासाठी २८ इमारती, तर दुरुस्तीसाठी ३८४ गावांना प्रत्येकी १ लाख रुपये निधी देण्यात आला. त्या निधीतून बांधकाम करावयाच्या इमारतींच्या कामांना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आॅगस्ट २०१९ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार तातडीने कामे सुरू करण्याचेही बजावले. विशेष म्हणजे, त्या आदेशात ३१ मार्च २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याचे म्हटले आहे. त्यापैकी अनेक कामे अद्यापही सुरूच झालेली नाहीत. प्रशासकीय आदेशानंतर विधानसभा निवडणूक, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता होती. या कचाट्यातून सुटताच कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीने लॉकडाऊन झाले. त्यामुळे बांधकाम सुरू करण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यापैकी आता १० इमारतींची बांधकामे पूर्ण झाली. दुरुस्तीची ८५ कामे पूर्ण झाल्याची माहिती सर्वसाधारण सभेत देण्यात आली. ती कामे तातडीने पूर्ण करण्याचे बजावण्यात आले आहे.या गावांमध्ये होणार अंगणवाडीची इमारतअंगणवाडीची नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी २८ गावांमध्ये अकोला तालुक्यातील माझोड, रोहणा, दहिहांडा, ताकोडा, बोंदरखेड, यावलखेड, हिंगणा तामसवाडी, सांगवी खुर्द, खेकडी, अंबिकापूर, गोरधा. मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू बाजार, दातवी, टिपटाळा, माटोडा, बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा, जांभरुण, हातोला, बाळापूर तालुक्यातील स्वरूपखेड, रिधोरा, झुरळ खुर्द, बल्हाडी, तेल्हारा तालुक्यातील खापरखेडा, अकोट तालुक्यातील पाटसूळ, शहानूर, पोपटखेड, पारळा, नेव्होरीचा समावेश आहे.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र