शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे!

By admin | Updated: September 6, 2016 02:30 IST

आयोग सुचविणार दुरुस्त्या; राजकीय पक्ष मात्र अस्वस्थ झाले आहेत.

अकोला, दि. ५: राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे महापालिकेने प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला. सदर आराखडा मंगळवारी निवडणूक आयोगाक डे सादर केला जाईल. त्यानुषंगाने पालिकेचे कर्मचारी सोमवारी मुंबईकडे रवाना झाले. मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे प्रभाग रचने तील फेरबदलाचा राजकीय पक्षांनी चांगलाच धसका घेतला असून, काही पक्षांत अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. यंदा महापालिका निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार पार पडेल. महापालिकेतील नगरसेवकांची संख्या विचारात घेऊन जास्तीत जास्त चार नगरसेवकांचा एक याप्रमाणे प्रभाग तयार होतील. सर्व प्रभागांत चार सदस्य होत नसल्यास एक प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांचा होईल. अथवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील, अशी रचना करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. प्राथमिक स्तरावर प्रभागाची पुनर्रचना करण्याचे काम महापालिकेने करायचे असून, आयुक्त अजय लहाने यांनी ही जबाबदारी उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे सो पविली आहे. मनपाने तयार केलेल्या प्रभाग रचनेनुसार प्रभागांची संख्या २0 झाली असून, प्रत्येक प्रभागात चार याप्रमाणे ८0 नगरसेवकांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. प्रगणकांनी तयार केलेल्या गटातील लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये जास्तीत जास्त २९ हजार ५४३ तर कमीत कमी २४ हजार लोकसंख्येचा निकष ठेवण्यात आला आहे. मनपाने तयार केलेला प्रभाग रचनेचा प्राथमिक आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल. त्यानुसार सोमवारी मनपाचे कर्मचारी आराखडा घेऊन मुंबईकडे रवाना झाले. निवडणूक आयोगाकडून या आराखड्यात बदल करून दुरुस्त्या सुचविल्या जाणार आहेत.