शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एकत्रित वीज बिल; महावितरण म्हणते भुर्दंड नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:03 IST

ग्राहकांनी वीज बिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

अकोला : लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीज वापराचे प्रत्यक्ष रिडिंग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे महिन्यासह जूनचे देण्यात आलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीज बिल स्लॅब बेनिफिटसह योग्य व अचूक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा अतिरिक्त भुर्दंड लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.कोरोना विषाणूमुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे महावितरणकडून मीटर रिडिंग, वीज बिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. रिडिंग बंद झाल्यामुळे राज्यातील लघुदाब ग्राहकांना सरासरी वीज बिल देण्यात आले. १ जूनपासून मीटर रिडिंग, वीज बिल वितरण व बिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. मीटर रिडिंग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर वीज ग्राहकांना लॉकडाऊन कालावधीमधील एप्रिल व मेसह जून महिन्याचे वीज बिल एकत्रित पाठविण्यात येत आहे.

१ एप्रिलपासून नवे वीज दरवीज ग्राहकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सरासरी वीज बिलांचा भरणा केला असल्यास जूनमधील तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलामध्ये एप्रिल व मे महिन्यांचा स्थिर आकार व विद्युत शुल्क वगळता उर्वरित रक्कम समायोजित करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना हिवाळ्यातील वीज वापराप्रमाणे सरासरी देयके पाठविण्यात आली होती; मात्र ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीज वापर व १ एप्रिल २०२० पासून लागू झालेले नवीन वीज दर यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यांचे मासिक परंतु एकत्रित दिलेले वीज बिल अधिक युनिटचे व रकमेचे असण्याची शक्यता आहे.

लिंकवर करा पडताळणीदोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीज वापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीज दर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीज ग्राहकांसाठी खास https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोलाelectricityवीज