शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसचे कार्यकर्ता प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:38 IST

अकोला: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसने कार्यकर्ता प्रशिक्षण सुरू केले असून, अकोल्यातही २५० निवडक कार्यकर्त्यांना हे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले.

अकोला: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसने कार्यकर्ता प्रशिक्षण सुरू केले असून, अकोल्यातही २५० निवडक कार्यकर्त्यांना हे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले. काँग्रेसचा इतिहास आणि सत्ताधाऱ्यांच्या फसव्या घोषणांची माहिती या प्रशिक्षणातून देण्यात आल्याची माहिती आमदार आणि राज्य कार्यकर्ता प्रशिक्षण प्रमुख रामहरी रूपनवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रा. अजहर हुसेन, महानगराध्यक्ष बबन चौधरी, सुनील धाबेकर, हिदायत पटेल, मदन भरगड, नातिकोद्दीन खतीब, डॉ. संतोष कोरपे व साजीद खान प्रामुख्याने उपस्थित होते.काँग्रेसचा जन्म आणि इतिहास उज्ज्वल आहे. त्या तुलनेत भाजपचा जन्म अलीकडचा आहे. काँग्रेसमध्ये नव्याने येणाºयांना शिस्त आणि इतिहासाची ओळख करून देण्यासाठी राहुल गांधींच्या पुढाकारात हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर सर्वत्र घेतले जात आहे. आतापर्यंत ५० जिल्ह्यांत अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले असून, त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होणार असल्याचा दावाही आमदार रूपनवर यांनी केला आहे. लीडरशीप इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून राज्यात चार प्रशिक्षक हे प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणात काँग्रेसने ६० वर्षांत केलेला विकास आणि बदल सांगितला जात असून, भाजप-मोदी सरकारच्या पाच वर्षांतील फसव्या बाबींवरही बोट ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. लवकरच दुसºया टप्प्यात ब्लॉकवाइज प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसची विचारधारा सर्वधर्मसमभावाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची आहे. सर्वसामान्य लोकांना या बाबी पटवून सांगण्याचे कार्य हे कार्यकर्ते करतील, असेही ते म्हणाले. पुलवामा प्रकरणी काँग्रेस भाजपाप्रमाणे राजकारण करणार नाही. देशाची एकजूटता दर्शविण्याची ही वेळ असल्याचेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात बोलले. लोकसभा निवडणूक संदर्भात विचारणा केली असता, समविचारी पक्षासोबत काँग्रेसची सकारात्मक बोलणी सुरू आहे. बोलणी अखेरच्या चरणात आहे, एवढेच सांगता येईल, असेही ते म्हणाले. त्यावेळी वामनराव थोटांगे, विजय शर्मा, दीपक बोरकर, कपिल रावदेव, अनंत बगाटे, तश्वर पटेल, संजय मेश्रामकर, डॉ. मोहन खरे, बबलू लोखंडे, आक्रोश सायखेडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.काँग्रेस कार्यकाळातील योजना नाव बदलून समोर आणल्या!काँग्रेस कार्यकाळातील विविध योजनांचे नाव बदलून भाजपने त्या समोर आणल्यात. आधार, जीएसटी, आवास आदी अनेक योजनांवर काँग्रेसचे कार्य सुरू होते. सामान्य माणसाला महागाई छळणार नाही, याचा विचार करून काँग्रेसने या योजना आणल्या होत्या; मात्र भाजप-मोदी सरकारने केवळ थापा दिल्या. पाच वर्षांतील त्यांचे आश्वासन त्यांनीच पाहावे म्हणजे समजेल. या सर्व बाबींचादेखील प्रशिक्षणात समावेश असल्याचे येथे सांगितले गेले.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेस