शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

करवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:51 IST

अकोला : महापालिकेने अव्वाच्या सव्वा दराने कर आकारणी  केल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचा आरोप करीत मन पातील विरोधी पक्षनेता साजिद खान यांच्या नेतृत्वात शुक्रवारी  सायंकाळी महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात ‘ताटवाटी  बजाओ’ आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी  भाजपाचे पदाधिकारी समोर न आल्यामुळे काँग्रेसने मुख्य रस्त्यावर  ठिय्या देणे पसंत केले. वाहतूक विस्कळीत होत असल्याचे पाहून  आंदोलनकर्त्यांना हटविण्यासाठी सिटी कोतवाली पोलिसांना  बळाचा वापर करावा लागल्याचे यावेळी दिसून आले. 

ठळक मुद्देपोलिसांकडून  बळाचा वापरसर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेने अव्वाच्या सव्वा दराने कर आकारणी  केल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचा आरोप करीत मन पातील विरोधी पक्षनेता साजिद खान यांच्या नेतृत्वात शुक्रवारी  सायंकाळी महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात ‘ताटवाटी  बजाओ’ आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी  भाजपाचे पदाधिकारी समोर न आल्यामुळे काँग्रेसने मुख्य रस्त्यावर  ठिय्या देणे पसंत केले. वाहतूक विस्कळीत होत असल्याचे पाहून  आंदोलनकर्त्यांना हटविण्यासाठी सिटी कोतवाली पोलिसांना  बळाचा वापर करावा लागल्याचे यावेळी दिसून आले. महापालिका प्रशासनाने २00१ मध्ये ‘सेल्फ असेसमेंट’द्वारे अ त्यल्प करवाढ केली होती. त्यानंतर प्रशासनाने दर तीन वर्षांनी  मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे भाग असताना मागील १५ वर्षां पासून एकदाही पुनर्मूल्यांकन केले नाही. या प्रक्रियेत प्रशासनाने  कुचराई केल्याचे दिसत असले, तरी अकोलेकरांना मुळातच अ त्यल्प कर लागू असल्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय  प्रशासनाने घेतला. ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे चटई  क्षेत्रफळानुसार पहिल्यांदाच पुनर्मूल्यांकन करून प्रशासनाने  सुधारित करवाढ लागू केल्यामुळे कराच्या रकमेत वाढ झाल्याचे  दिसून येते. ही करवाढ अमान्य असल्याचे सांगत विरोधी पक्षनेता  साजिद खान पठाण यांनी वेळावेळी आंदोलनाचे हत्यार उपसले.  १९ ऑगस्ट रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत करवाढीचा मुद्दा  पटलावर येणार आहे. त्या पृष्ठभूमीवर विरोधी पक्षनेता साजिद  खान यांनी शुक्रवारी पुन्हा आंदोलनाची धार तीव्र केली. महापौर  विजय अग्रवाल यांच्या दालनात ‘ताटवाटी बजाओ’ आंदोलन  छेडल्यानंतर याठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी भाजपाचे कोण तेही पदाधिकारी उपस्थित नसल्याचे पाहून काँग्रेसने महा पालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले. सत्ताधारी व  प्रशासनाची भूमिका पाहता काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन छेडले. यामुळे वाहतूक विस्कळीत  होत असल्याचे पाहून सिटी कोतवाली पोलिसांना आंदोलनक र्त्यांना ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करावा लागल्याचे चित्र  दिसून आले. आंदोलनात काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महा पौर मदन भरगड, उत्तर झोन सभापती मोहम्मद नौशाद, नगरसेवक  जिशान हुसेन, पराग कांबळे, इरफान खान, कपिल रावदेव,  महिला आघाडी महानगराध्यक्ष सुषमा निचळ, रवी शिंदे, नि िखलेश दिवेकर, कशीश खान, आकाश कवडे आदींसह असंख्य  कार्यकर्ते सहभागी होते. 

अकोलेकरांवर लादलेला कर कमी नव्हे, तर रद्द करावा, ही  काँग्रेसची आग्रही मागणी आहे आणि राहील. आंदोलन शांततेत  सुरू असताना पोलिसांनी बळाचा वापर केला. यामुळे पोलिसांवर  राजकीय दबाव असल्याचे दिसून आले. -साजिद खान, विरोधी पक्षनेता मनपा