शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्यावर संभ्रम; शिक्षण विभागाचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 10:14 IST

नेमके नियोजन कसे राहील, यासंदर्भात मनपाच्या शिक्षण विभागाचा चांगलाच कस लागणार आहे.

- आशिष गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटात येत्या २६ जूनपासून महापालिकेच्या शाळा सुरू करण्याचा चेंडू जिल्हा प्रशासनाने मनपा आयुक्तांकडे टोलविला असून, चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मुद्यावर मनपा प्रशासन संभ्रमात आहे. शाळांमधील उपलब्ध सोयी-सुविधा लक्षात घेता २६ जूनपासून शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवल्या जाणार, आॅनलाइन पद्धत अमलात आणल्यास त्याचे नेमके नियोजन कसे राहील, यासंदर्भात मनपाच्या शिक्षण विभागाचा चांगलाच कस लागणार आहे.संसर्गजन्य कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असून, जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता संपूर्ण शहर रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. अशा स्थितीत यंदाचे शैक्षणिक सत्र २६ जूनपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय मनपा आयुक्तांकडे सोपविण्यात आला.सद्यस्थितीत शहराच्या कानाकोपऱ्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने संबंधित परिसर कंटेनमेन्ट झोन घोषित केला जात आहे. अशा स्थितीत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात मनपाच्या स्तरावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे संकट व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता आयुक्त संजय कापडणीस कशा पद्धतीने नियोजन करतात, याकडे संपूर्ण अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

एकच शाळा सुरू होईल!शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता नववी ते दहावी व बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा १ जुलैपासून सुरू होणार आहे. यादरम्यान, वर्ग खोल्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागेल. विद्यार्थ्यांची पटसंख्या ध्यानात घेऊन एका वर्ग खोलीचे दोन वर्ग करावे लागतील. तसेच सम-विषमनुसार वर्ग उघडावे लागतील. अर्थात, या निकषानुसार एकमेव मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मध्ये इयत्ता नववीचा वर्ग सुरू करता येईल. परंतु इयत्ता पहिली ते सातवी सॅनिटायजर कराव्या लागतील सोशल डिस्टंस ठेवण्याचे निर्देश, इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी जुलै पासून, अशी एकच शाळा आहे. उर्वरित ३२ शाळांचा प्रश्न कायम,अशावेळी पालकांशी व विद्यार्थ्यांशी संपर्क व संवाद साधावा लागेल, शाळा सुरू होईपर्यंत, पुस्तके घरपोच द्यावे लागतील, घरी अभ्यासासाठी प्रोत्साहीत करावे लागेल, चिमुकल्यांना आॅनलाईन शक्यच नाही....तर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवा!कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रणालीचा वापर करण्याचे शासनाचे निर्देश आहेत; परंतु मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता किती विद्यार्थी अत्याधुनिक मोबाइलद्वारे आॅनलाइन शिक्षण घेऊ शकतील, यावर प्रश्नचिन्ह आहे. अशा स्थितीत आॅनलाइन शक्य नसेल तर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकविण्याचे शिक्षकांना निर्देश आहेत. शिवाय यापैकी किती विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण प्रणाली समजू शकणार, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

सर्व शाळा रेड झोनमध्ये! आजरोजी शहराच्या प्रत्येक भागातून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शहरात मनपाच्या एकूण ३३ शाळा असून, त्यांचा रेड झोनमध्ये समावेश होतो. रेड झोनमधील शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावरून स्पष्ट निर्देश प्राप्त नसल्यामुळे जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन संभ्रमात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा