शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या पेपरमधील ‘कॉपी’चा गोंधळ सर्वसंमतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 15:20 IST

अहवाल अमरावती बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती परीक्षक बी.बी. लोखंडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : सद्या सुरू असलेली बारावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हावी, यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र धावंडा येथील प्रशिक विद्यालय या परीक्षा केंद्रावर सर्वसंमतीने गैरप्रकार सुरू असल्याचा अहवाल सहायक परीक्षक प्रा. सुनील काळे यांनी मानोरा पंचायत समितीकडे शनिवारी सादर केला. यामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली.सहाय्यक परीक्षक प्रा. सुनील काळे यांची धावंडा येथील प्रशिक विद्यालय परीक्षा केंद्र क्रमांक ९७३ वर इंग्रजी पेपरसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या परिक्षा केंद्रास माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नारळे व गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांनी भेटी दिल्या. त्यावेळी परिक्षा केंद्रावर प्रचंड प्रमाणात कॉपीचा गैरप्रकार सुरु असल्याचे निदर्शनास आले. या गैरप्रकारासाठी केंद्रावर नियुक्त सर्वचजण जबाबदार आहे व सुरू असलेल्या गैरप्रकाराला सर्वांची समर्थ साथ असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय परिक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त देखील अपुरा राहतो व बैठक व्यवस्थ सुद्धा कमकुवत असल्याचे प्रा. काळे यांनी अहवालात म्हटले आहे. तथापि, प्रशिक विद्यालय या केंद्रावरील परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हायची इच्छा असेल तर दिवसभर शासकीय पथक केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे, अशा स्पष्ट सूचनाही प्रा. काळे यांनी अहवालात दिल्या आहेत. यामुळे एकच खळबळ माजली.दरम्यान, सदर अहवाल अमरावती बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती परीक्षक बी.बी. लोखंडे यांनी दिली.