शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त पाच कीटकनाशकांच्या विक्रीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:55 IST

अकोला : मागील नोव्हे.-डिसेंबर महिन्यात राज्यात बंदी घातलेल्या वादग्रस्त पाच कीटकनाशकांच्या विक्रीबाबत शेतकरी आणि कृषी केंद्र संचालकांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाने मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात वादग्रस्त पाच कीटकनाशकांवर बंदी घातली होती.अकोलासह विदर्भात बंदी आणल्याने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाया झाल्यात.यंदा मात्र या पाच कीटकनाशकांसदर्भात अद्याप कोणताही आदेश शासनाचा नाही.

अकोला : मागील नोव्हे.-डिसेंबर महिन्यात राज्यात बंदी घातलेल्या वादग्रस्त पाच कीटकनाशकांच्या विक्रीबाबत शेतकरी आणि कृषी केंद्र संचालकांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.कीटकनाशकांच्या वापरामुळे ६३ शेतकरी मजुरांचा बळी गेल्याचा धक्कादायक अहवाल समोर आल्यानंतर राज्य शासनाने मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात वादग्रस्त पाच कीटकनाशकांवर बंदी घातली होती. बंदी घातलेल्या कीटकनाशकांमध्ये अ‍ॅसिफेट ७५ टक्के एसपी, मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एसएल, डायफेनथीयूरॉन ५० टक्के डब्ल्यूपी, पिप्रोनील ४० टक्के अधिक ईमडाक्लोप्राईड, प्रोफेवोफॉस ४० टक्के यांचा समावेश आहे. अकोलासह विदर्भात बंदी आणल्याने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाया झाल्यात. ही झाली मागील वर्षाची स्थिती. यंदा मात्र या पाच कीटकनाशकांसदर्भात अद्याप कोणताही आदेश शासनाचा नाही. पाचही कीटकनाशकांचा वापर विदर्भात सर्रास होतो. विदर्भात कापसाचा पेरा जास्त असून, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. अशावेळी विदर्भातील शेतकरी अ‍ॅसिफेट आणि मोनोक्रोटोफॉसचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कीटकनाशकांची फवारणी करताना नीट काळजी न घेतल्याने शेतमजूर मरण पावल्याचे कीटकनाशक कंपनीचे म्हणने आहे. त्यामुळे पुन्हा बंदीचा आदेश निघालेला नाही. जर या कीटकनाशकांचा वापर केला नाही तर विदर्भातील कापसाच्या उत्पादनावर फरक पडतो. त्यामुळे उपरोक्त कीटकनाशके विकायचे की नाही, असा प्रश्न कृषी केंद्र संचालकांना पडला आहे. दरम्यान, कृषी अधिकारी यांनादेखील यासंदर्भात स्पष्ट निर्देश नसल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.उपरोक्त पाच कीटकनाशकांवर बंदी घातल्याचा आदेश दोन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात आला होता. पुन्हा तसा आदेश आला तरच आम्ही कृषी केंद्र संचालकांवर कारवाई करू, अन्यथा अशी कारवाई नियमबाह्य ठरेल.-एम.बी.जवंजाळ, प्रभारी कृषी अधिकारी, अकोला.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी