शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरतीबाबत संभ्रम कायम, अद्याप तारीख नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:12 IST

अकोला: गत काही महिन्यांपासून राज्यात शिक्षक भरती सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. शिक्षण विभागाद्वारे बिंदु नामावली अद्ययावत करण्यात आली.

अकोला: गत काही महिन्यांपासून राज्यात शिक्षक भरती सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. शिक्षण विभागाद्वारे बिंदु नामावली अद्ययावत करण्यात आली. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करून लवकर शिक्षक भरतीला सुरुवात करण्यात येणार होती; परंतु अद्यापपर्यंत शिक्षक भरतीची शासनाने तारीख जाहीर न केल्यामुळे शिक्षकांमध्ये भरतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे; मात्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शिक्षक भरती होणारच, असे स्पष्ट केले आहे.राज्यातील २0 हजार रिक्त पदांसाठी शासनाने शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक भरती घेण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या असून, पवित्र पोर्टलवर शिक्षण संस्थांची बिंदु नामावली, रिक्त पदे, जातीचा संवर्ग अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षण संस्थांची बिंदु नामावली शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयांकडे पाठविण्यात आली होती. या संस्थांची बिंदु नामावली सर्व शिक्षणाधिकाºयांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडे तपासणीसाठी पाठविली होती; परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्यामुळे शिक्षक भरती होईल की नाही, याबाबत पात्र शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक तोंडावर असल्यामुळे युती शासन बेरोजगार शिक्षकांना शिक्षक भरतीचे गाजर तर दाखवित नाही ना! अशी भीती शिक्षकांना वाटत आहे. त्यामुळे शासनाने आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शिक्षक भरतीची तारीख निश्चित करून तातडीने भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शासनाने १0 टक्के आरक्षणाचे परिपत्रक आताच काढले आहेत. त्यामुळे १0 टक्के आरक्षणानुसार शिक्षण संस्थांचे रोष्टर पवित्र पोर्टलवर भरण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शिक्षक भरती सुरू करणार असल्याचेही सोळंकी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) 

पात्र शिक्षकांनी निश्ंिचत असावे. भरतीच्या दृष्टिकोनातून शासनस्तरावर तयारी सुरू आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गत आठवड्यातच शासनाने १0 टक्के आरक्षणाचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे थोडा उशीर लागत आहे; परंतु शिक्षक भरती होणारच.-विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeachers Recruitmentशिक्षकभरती