शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आधार केंद्र सुरु करण्यास सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 19:35 IST

प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळून आधार नोंदणी व दुरुस्ती केन्द्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सशर्त परवानगी एका आदेशाद्वारे दिली आहे.

अकोला : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळून आधार नोंदणी व दुरुस्ती केन्द्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सशर्त परवानगी एका आदेशाद्वारे दिली आहे. अटी व शर्तींच्या अधीन राहून आधार केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.सर्व आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये सामग्री व उपकरणे व परिसराचे निर्जंतुकीकरण करुन घेणे आधार नोंदणी चालकास बंधनकारक राहील. केंद्र चालक व इतर आॅपरेटर यानी स्वच्छता विषयक सर्व निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे. दर २० मिनिटांनी हात साबणाने धुणे, सॉनिटायझर वापरणे, तोंडाला मास्क किंवा स्वच्छ रुमाल वापरणे इत्यादी, आधारनोंदणी व दुरुस्ती केन्दामधील आॅपरेटर काम करताना नाक, तोड व डोळयांना स्पर्श होणार नाही याची आवश्यक दक्षता घेतील. आॅपरेटर व येणा-या नागरिकांनी पुर्णवेळ तोंडाला मास्क अथवा स्वच्छ रुमाल वापरावा, केवळ फोटो काढण्यासाठी मास्क काढण्यास परवानगी देण्यात येईल. आधार नोदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये येणाºया नागरिकांनी वैयक्तीक स्वच्छतेचे पालन केले पाहिजे. आधार नोंदणी व दुरुस्तीकेंद्रामध्ये केंद्र व्यवस्थापक यांनी टेबल आॅपरेटर यांच्या बसण्याच्या जागे दरम्यान शारीरिक अंतर किमान एक मिटर असल्याचे सुनिश्चित करावयाचे आहे. पूर्वनोंदणी शिवाय येण्याची नागरिकांना परवानगी दिली जावू नये. नागरिकांना सामाजिक अंतर निश्चित करण्यासाठी योग्य अंतरासह जेथे उपयुक्त असेल तेथे मोकळ्या हवेत बसण्यास प्रोत्साहित करावे. नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला,ताप, कफ व श्वासोच्छवासाच्या अडचणी इत्यादी सारखे लक्षणे आढळल्यास त्यांनी आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये न येणेबाबत फलक दर्शनी भागामध्ये लावावेत. प्रत्येक आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये युआयडीएआयने पुरविलेल्या टेम्पलेटनुसारनागरिकांसाठी पत्रक दर्शनी भागात लावावेत. आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये आॅपरेटरांनी कोव्हीड-१९ हॉटस्पॉटवर जाणे किंवा अशा भागातून प्रवास करू नये, प्रतिबंधीत क्षेत्रामधील भागातआधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरु करण्यात येऊ नयेत. येणा-या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करावे व त्यांची दैनदिन नोंद ठेवावी, आदी सुचना देण्यात आल्या आहेत.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झालेचे निदर्शनास आल्यास किंवा आदेशाचे पालन न झाल्यास कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेने शिक्षेस पात्र अपराध केला असे मानण्यात येवून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAkolaअकोला